Rupee Vs Dollar News: अमेरिका-इस्राइल-इराण युद्धाचा परिणाम होणार; युद्ध लांबलं तर सोने २ लाखांच्या पार?
Rupee Vs Dollar News: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर दिसून आला आहे. सोन्याचे दर युद्धामुळे वाढत असल्याचे पाहायला मिळते. पुण्यातील ज्वेलर्सचे अतुल अष्टेकर यांनी सोन्याच्या दरांवर भाष्य केले. २७-२८ तारखेपर्यंत सोन्याचे दर १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत होते. शनिवारी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सोन्याचे दर १ लाख ६९ हजारांवर पोहोचले होते. मंगळवारी सोन्याचे दर कमी झाले होते, बुधवारी सोन्याचे दर १ लाख ६३ हजारांवर आहेत, असे अष्टेकर यांनी सांगितले.
अतुल अष्टेकर म्हणाले की, जागतिक पातळीवर अस्थिरता असल्याने सोन्याचे दर कमी जास्त होत आहे. हे युद्ध किती दिवस चालतं यावर सोन्याचे दर अवलंबून आहेत. युद्ध आठ दहा दिवसात संपलं तर परिस्थिती नॉर्मल होईल. बरेच तज्ज्ञ म्हणतात युद्ध तीन चार आठवडे लांबलं तर परिणाम तेलावर होईल. तेलाचा पुरवठा कमी झाला तर भविष्यात त्याचा महागाईवर परिणाम होतो. जेव्हा महागाईवर परिणाम होतो, त्यावेळी सोन्याचे भाव वाढलेले दिसतात. महागाई वाढली तर सोन्याचे दर वाढतील, असंही त्यांनी म्हटलं.
Hormuz Strait News: भारताचा सागरी संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय; एचएएल-रशियाचा ५,०८३ कोटींचा करार
सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होतो. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत सोन्याचे दर ८० ते ९० हजार रुपयांदरम्यान दर होते. सध्या सोन्याचा दर १ लाख ६० हजारांच्यावर आहे. भारतीय ग्राहक आहेत त्यांच्या मानसिकतेचा विचार केला तर लग्नामध्ये सोने खरेदी केले जाते. या वर्षी लग्नाच्या तारखा खूप आहेत. १५ मे पर्यंत लग्नाच्या तारखा खूप आहेत. जूनपासून डिसेंबरपर्यंत लग्नाच्या तारखा आहेत. लग्नाची खरेदी ग्राहकांना करावीच लागेल. यात आव्हान आहे की ग्राहकांच्या बजेटमध्ये दागिने बसणे हे आव्हान असेल.
ग्राहकांच्या सोने खरेदीचा कल कमी होणार नाही. दिवाळीत सोन्याचे दर वाढले तरी ग्राहकांनी खरेदी थांबवलेली नाही, असेही अष्टेकर यांनी म्हटले. सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहता तेव्हा ती शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसारखी नाही, आज घेतले आणि उद्या विकले असे नाही. आजपासून १० वर्षानंतर विचार केला तर तेव्हाचे जे दर असतील तेव्हा विकायला गेला तरी फायदा होईल. शॉर्ट टर्मचा विचार न करता लाँग टर्मचा विचार करावा. सोन्यात गुंतवणूक करायची असेल टप्प्या टप्प्याने करावी, असेही अष्टेकर म्हणाले.
अमेरिकन भक्कम होत आहे, डॉलर त्या तुलनेत रुपया कमजोर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले नसते आणि डॉलर जर वाढला आणि रुपया कमजोर झाल्यानं भारतात येणाऱ्या सोन्याचा खर्च वाढतो. युद्ध पुढील आठ दहा दिवसात थांबले तर सोन्याच्या दरात एक, दोन, तीन टक्के, पाच टक्के युद्धाचे दर पाहत होतो तेवढे म्हणजेच १ लाख ६० हजार रुपये होऊ शकतो. तर, युद्ध लांबलं तर सांगता येणार नाही पण सोन्याचे दर २ लाखांपर्यंत जाऊ शकतात, असे अतुल अष्टेकर म्हणाले.






