US Iran War : भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेचा इराणवर निशाणा? सरकारने उधळला अफवांचा डाव (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?
अमेरिकेचे माजी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे लष्करी तळे इराणने पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. यामुळे इराणवर हल्ल्यासाठी आता अमेरिकेला भारताच्या नौदल तळांचा वापर करावा लागत आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे भारताने म्हटले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सोशल मीडिया मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MEAFactCheck या अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट केली आहे. मंत्रालयाच्या फॅक्ट चेक हँडलवर स्पष्ट करण्यात आले आहे की, भारताच्या कोणत्याही नौदल तळांचा, जमिनीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध लष्करी कारवाई केला जातता नाहीये. हा दावा भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी केला जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Fake News Alert! Claims being made on OAN, a US based channel that Indian ports are being used by the US Navy are fake and false. We caution you against such baseless and fabricated comments. pic.twitter.com/xiFWnkoXBk — MEA FactCheck (@MEAFactCheck) March 4, 2026
इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन झाले असून इराण आक्रमक झाला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने आखाती देशातील अमेरिकन लष्करी तळे आणि दूतावासांवर हल्ले केले आहेत. तर अमेरिकाही इराणवर सातत्याने पलटवार करत आहे. यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे. याच वेळी दक्षिण आशियात श्रीलंकेतही इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला केला आहे. यामध्ये 87 नाविकांचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय या युद्धाचा भारतालाही फटका बसत आहे. मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारताच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. तसेच भारताची आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवाही ठप्प झाली आहे. आणि व्यापारावर परिणाम होत आहे.
Ans: अमेरिकेचे माजी कर्नल डग्लस मकग्रेगर यांनी दावा केला आहे की, अमेरिकेचे लष्करी तळे नष्ट झाल्याने भारताच्या बंदरगाहांचा वापर करुन इराणवर निशाणा साधला जात आहे.
Ans: भारतीय बंदरगाह अमेरिका वापरत असल्याच्या दावा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला आहे. हा दावा पूर्णपमे खोटा असल्याचे सांगत आपल्या फॅक्ट चेक मीडियावर पोस्ट केले आहे.
Ans: मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारताच्या पर्यटन, विमान वाहतूक आणि व्यापारावर परिणाम होत आहे.






