Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Shirsat: ‘आम्हाला ऑपरेशन टायगर ३…’, उबाठा आमदारांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य

ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर आता आमदारही फुटणार असल्याच्या चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'ऑपरेशन टायगर ३' ची गरज नसून आमदार स्वतःच बाहेर पडण्यास तयार असल्याचा दावा त्यांनी केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 28, 2026 | 02:57 PM
उबाठा आमदारांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य (Photo Credit- X)

उबाठा आमदारांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘आम्हाला ऑपरेशन टायगर ३…’
  • उबाठा आमदारांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य
  • जाणून घ्या काय म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): शिवसेना उबाठाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता पक्षाचे आमदारदेखील फुटण्याची चर्चा सुरु झाली आहे. लवकरच ऑपरेशन टायगर ३ मोहीम सुरु होणार असल्याचेही बोलले जात आहे. यावर, आम्हाला ऑपरेशन तीन करण्याची गरजच नसल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. ज्यांनी आम्हाला ओ दिले त्यांना आम्ही साथ देऊ असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

उबाठाचे सहा खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश केला. खासदार फुटल्यानंतर आता पक्षातील आमदारदेखील फुटणार असल्याच्या चर्चा राज्यात सुरु झाल्या आहेत. यावर मंत्री शिरसाट म्हणाले, आम्हाला टायगर ३ करायची आवश्यकता नाही. आमदार, नगरसेवक हे स्वतःच तिथे थांबायला आता तयार नाही. ते स्वतःच बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आम्हाला टायगर ३ करायचे नाही, पण ते यायला तयार असतील, आम्हाला साद गाळातील त्यांना आम्ही साथ देऊ असे शिरसाट पुढे म्हणाले.

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत, यावर शिरसाट म्हणाले, इतके खासदार पक्ष सोडून गेले याचे चिंतन, मनन करण्याचा उद्धव ठाकरेंचा स्वभावच नाही. त्याची त्यांना गरजही वाटत नाही. जिल्ह्याचा नेतृत्व करणारा माणूस जात असेल तर यामागे काहीतरी कारण असेल, हे जाणून घेणे गरजेचे असताना, केवळ कार्यकर्त्यांना दाखवण्यापुरता हा दौरा असल्याची टीका शिरसाट यांनी केली. पक्षात इतकी मोठी घडामोड घडूनही आपला नेता अजूनही बाहेर का निघालेला नाही, असे कार्यकर्त्यांना वाटतेय.

तर कार्यकर्ता काय करणार ?

त्यामुळे कार्यकत्यांच्या समाधानसाठी हा दौरा काढला आहे. कार्यकर्त्याला बळ दिले असे यातून दाखवले जाईल. मूळ प्रश्नांना बगल देण्याचा त्यांचा कायमस्वरूपी स्वभाव राहिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी कधीचीव कार्यकत्यांचे मन राखले नाही, त्यांना भेटले नाही. त्यांना गेटच्या बाहेरच ठेवले. प्रश्न सोडवताना आपला नेताच जर आपल्याला बळ देत नसेल तर कार्यकर्ता काय करणार ? २०२२ पासून पक्षात जी फुटाफूट सुरु आहे.

शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल

राममंदिरातील पैशांचा राजकारणाशी काय संबंध ?

अयोध्येतील राम मंदिराच्या पैशांचा घोटाळा झाल्याचा आरोप उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या पैशांवर देशाचे राजकारण सुरु असल्याचेही ते म्हणाले होते. यावर शिरसाट म्हणाले, असे म्हणणे बावळटपणाचे लक्षण आहे. राम मंदिराचा हिशेब मागणायचा त्यांना काहीही अधिकार नाही. तुम्ही राम मंदिरात अजून दर्शनासाठीही गेलेले नाही, तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे? तो अधिकार भक्तांना आहे, यामुळे रामभक्त व्यथित झाल्याचे शिरसाट म्हणाले. तुम्हाला मुंबई महापालिकेचा हिशोब मागितला तर तुम्हाला पळती भुई थोडी होईल अशी टीकाही त्यांनी खा. राऊतांवर केली.

मुख्यमंत्र्यांनी देखील पाटीलची दखल घेतली

संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे दीना पाटील हे व्यथित झालेले आहेत. या ओघात त्यांच्याकडून पत्रकारांविषयी असभ्य वक्तव्य झाले. याची मी विधानभवनात माफीही मागितली आहे. एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यांना समजावले आहे. यावर दीना पाटील यांनी माफीदेखील मागितली आहे. जे घडलं ते रागाच्या भरात घडल्याचे स्पष्टीकरण मंत्री शिरसाट यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनीदेखील याची दखल घेतली असल्याचे ते म्हणाले.

संभाजीनगरमध्ये इंधन संकट भीषण! पालकमंत्र्यांच्या तंबीनंतर पेट्रोल आले, पण डिझेल संपले; ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी हवालदील

Web Title: Sanjay shirsat makes a major statement regarding speculations about ubt mlas switching parties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • MAL Sanjay Shirsat
  • shivsena
  • UBT
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
1

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
2

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
3

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद

शिवसेना चिन्हाच्या सुनावणीत कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का?
4

शिवसेना चिन्हाच्या सुनावणीत कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.