नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याला तुफान पावसाने झोपडले असून 12 दिवसांआधी मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. यामुळे मुंबईमध्ये जनजीवन विस्कळित झाले. भूमिगत मेट्रो सेवेचे तळे झाले तर लोकल सेवा ठप्प पडली. रस्त्यांवर नदी अवतरली होती यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार निशाणा साधला. यावर आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार नारायण राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. नारायण राणे म्हणाले की, मुंबईत पाऊस पडतो, जुलै ऑगस्टला अधिक पाऊस पडतो. सरकारला मदत करायची सोडून हे टीका करतात. एकनाथ शिंदेंना नावं ठेवता. तुम्हाला नावं ठेवली तर? आदित्य ठाकरेंना धड मराठी बोलता येत नाही, तोतरे बोलतात. आम्ही नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल? आरशात तुमचे चेहरे बघा, अमित शाह यांचं नाव घेऊ नका, अडचणीत येताल,” अशा शब्दांत नारायण राणे यांनी इशारा दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. डिनो मोरियाच्या कितीतरी कंपन्या आहेत. केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहेत. डिनो मोरियाचे कदमशी संबंध आहेत. माझ्याकडे 19985 पासूनचा हिशोब आहे. परदेशातील गुंतवणुकीची माझ्याकडे माहिती येत आहे. अमित शाह, मोदी, भाजप हे शब्द उद्धव ठाकरेंनी उच्चारू नयेत. आता वीस आमदार आहेत, पुढच्यावेळी पाचही नसतील,” असा घणाघाती टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “कोविड काळात खिचडीमध्ये घोटाळा, बॉडीबॅग खरेदीमध्ये घोटाळा करणारे खरे भ्रष्टाचारी असून त्यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टीपण्णी करण्याचा अधिकार नाही. संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा कायम द्वेष केला. राऊत यांच्या मुलाखतीमुळेच दिघे यांना टाडा लागला. त्यामुळे राऊत यांच्या स्वप्नात धर्मवीर आनंद दिघे जाणे कधीच शक्य नाही, याउलट हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या स्वप्नात आले होते, असे खासदार म्हस्के म्हणाले. बाळासाहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसातही मुंबई आणि ठाण्यात केलेल्या कामाचे कौतुक केले,” असे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.