Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटात बंडाचे पडसाद; भाजपला साथ देणाऱ्या तीन आमदारांवर मोठी कारवाई

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील तीन आमदारांनी भाजप समर्थित उमेदवाराला पाठिंबा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. या आमदारांवरील कारवाईबाबत निवडणुकीनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 14, 2026 | 03:34 PM
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटात बंडाचे पडसाद; भाजपला साथ देणाऱ्या तीन आमदारांवर मोठी कारवाई

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटात बंडाचे पडसाद; भाजपला साथ देणाऱ्या तीन आमदारांवर मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सोलापूर विधान परिषद निवडणुकीत केवळ महायुती आणि महाविकास आघाडीतील लढतच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील अंतर्गत मतभेदही उघडपणे समोर येत आहेत. पक्षाच्या चार आमदारांपैकी तीन आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवल्याने राजकीय वातावरण तापले असून, या आमदारांविरोधात कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना, निवडणुकीनंतर पक्षाची बैठक होईल आणि त्यामध्ये बंडखोर आमदारांबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून राजेंद्र राऊत तर महाविकास आघाडीकडून वसंतराव देशमुख रिंगणात आहेत. सुरुवातीला ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. मात्र काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिली. या प्रक्रियेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रचारादरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी “आमच्याकडे 600 अदृश्य मतं आहेत” असा दावा करत निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. मात्र प्रत्यक्षात पक्षातील काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांची राजकीय लढाई अधिक कठीण झाल्याचे चित्र दिसत आहे.

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि आमदार नारायण पाटील यांनी उघडपणे भाजप समर्थित उमेदवाराच्या बाजूने भूमिका घेतल्याची चर्चा आहे. यामागे स्थानिक राजकारणातील नाराजी आणि काही प्रलंबित वाद कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

मोठी बातमी ! वळसे पाटलांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; भेटीचं कारण आलं समोर

उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर हे देखील या निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तर आमदार अभिजीत पाटील यांनी पंचायत समिती निवडणुकीतील घडामोडींवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. वसंतराव देशमुख यांनी यापूर्वी भाजपला मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मात्र पक्षातील मतभेद सार्वजनिकपणे मांडणे किंवा विरोधी पक्षासोबत जाऊन पाठिंबा जाहीर करणे योग्य नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. पक्षाने सर्व आमदारांना अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या कारवाईबाबत कोणतीही घाई न करता निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा केली जाणार आहे. मात्र निकालानंतर होणाऱ्या बैठकीत पक्षशिस्त, आमदारांची भूमिका आणि पुढील राजकीय दिशा यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सोलापूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल जितका महत्त्वाचा ठरणार आहे, तितकीच उत्सुकता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आपल्या बंडखोर आमदारांबाबत कोणती भूमिका घेणार याबाबतही निर्माण झाली आहे.

Operation Tigerच्या चर्चांदरम्यान ‘मातोश्री’वर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक; कोण उपस्थित, कोण गैरहजर?

Web Title: Solapur mlc election ncp sharad pawar group rebel mlas shashikant shinde statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • BJP
  • NCP Sharad Pawar
  • Shashikant Shinde
  • Solapur
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
1

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
2

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
3

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?
4

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.