Reservation of Mayoral Posts: २९ महानगरपालिकांच्या महापौर निवडीचे काऊंटडाऊन सुरू; लवकरच आरक्षण सोडत जाहीर होणार
महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर आरक्षणाकडे लागले आहे. ही प्रक्रिया लोकशाहीतील सर्वसमावेशकतेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. या प्रक्रियेबाबतची अधिक माहिती आणि पुढील टप्पे खालीलप्रमाणे आहेत:
महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण हे चक्रानुसार (Rotation Policy) ठरवले जाते. यामध्ये राज्य सरकारकडून सोडत (Lottery) काढली जाते. याचे मुख्य नियम खालीलप्रमाणे असतात:
सर्वसमावेशकता: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिक मागास प्रवर्ग (OBC) आणि महिला (सर्व प्रवर्ग) यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आणि नियमानुसार प्रतिनिधित्व दिले जाते.
बदलाचा नियम: जर मागील वेळी एखादे पद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी असेल, तर या वेळी ते इतर राखीव प्रवर्गासाठी जाण्याची शक्यता जास्त असते, जेणेकरून सत्तेचे समान वाटप होईल.
महिला आरक्षण: एकूण जागांपैकी ५०% पदे महिलांसाठी आरक्षित असतात, त्यामुळे २९ पैकी निम्म्या महापालिकांमध्ये महिला महापौर पाहायला मिळतील.
राज्यातील नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेसह २५ महापालिकांवर महायुतीची सत्ता आली. मुंबई महापालिकेतील २२७ जागांसाठ झालेल्या या निवडणुकीत महायुतीचे एकूण ११८ सदस्य निवडून आले. यात भाजपला ८९ जागांवर विजय मिळवला, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६५ नगरसेवक निवडून आले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला २९ जागा मिळाल्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेदेखील ६ नगरसेवक निवडून आले, तर शरद पवार गटाला १ जागा आणि अजित पवार गटाला ३ जागा तर इतर पक्षांचे २ नगरसेवक निवडून आले. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेत ८ जागांवर एमआयएमचे नगरसेवक निवडून आले. पण मुंबई भाजपच्या सर्वाधिक जागा मिळवल्यामुळे याठिकाणी भाजपचाच महापौर बसणार असल्याचे निश्चत झाले आहे. (BMC Election 2026)
BMC Election Result 2026: फूट आणि फटका, तरीही ठाकरेंचा झुंजार लढा; मुंबईतील ६५ जागांचा खरा अर्थ काय?
राज्यातील सर्व २९ महापालिकांचे निकाल लागलेले असल्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी ‘आरक्षण’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत कोणत्या गटातील नगरसेवक महापौर बनणार हे स्पष्ट होत नाही. यामुळे अनेक इच्छुकांनी सध्या आपापल्या पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुढील टप्पे खालीलप्रमाणे असतील:
विभागीय आयुक्तांकडून सूचना: आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर संबंधित विभागीय आयुक्त महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करतात.
अर्ज भरण्याची प्रक्रिया: पात्र प्रवर्गातील नगरसेवक महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरतात.
निवडणूक: जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील, तर महापालिकेच्या सभागृहात प्रत्यक्ष मतदान होऊन महापौरांची निवड केली जाते.
राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक १४२५ नगरसेवक निवडून आले, त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे गटाचे ३९९ उमेदवार निवडून आले. त्यानंतर काँग्रेसचे ३२४ नगरसेवक निवडून आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे १६७, शिवसेना ठाकरे गटाचे १५५, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ३६, तर मनसेचे १३ उमेदवार विजयी झाले. बहुजन समाजवादी पार्टीचे ६ आणि एमआयएमचे १२५ उमेदवारांनी महापालिका निवडणुकीत विजय मिळवला. या पद्धतीने राज्यात भाजपचे सर्वाधिक नगरसवेक निवडून आलयाने भाजपने राज्यभरात एकच जल्लोष केला.






