File Photo : manmohan-singh
Manmohan Singh Death News: Live Updates / नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीन एम्स (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
हेदेखील वाचा : Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन; AIIMS मध्ये घेतला अखेरचा श्वास
दोनवेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले डॉ.मनमोहन सिंग यांना अनेक दिवस आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. सिंग यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण, अर्थशास्त्र आणि राजकारणात विलक्षण कामगिरी केली. डॉ.मनमोहन सिंग यांनी 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती. यानंतर त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून (यूके) अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली होती. त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफील्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल पदवी मिळवली होती.
राजस्थानमधून राजकारणाची अखेरची इनिंग
2019 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते राजकारणापासून दूर राहिले. तेव्हापासून मनमोहन सिंग हे राजकारणापासून अलिप्तच दिसून आले. डॉ. मनमोहन सिंग यांनी राजकारणातील शेवटची इनिंग राजस्थानमधूनच खेळली आहे. राज्यसभा सदस्य असताना त्यांनी राजस्थानला एक-दोन भेटी दिल्या होत्या. त्यादरम्यान त्यांची अनेक विधाने चर्चेत होती.
2019 ते 2024 पर्यंत राज्यसभा खासदार
मनमोहन सिंग हे 19 ऑगस्ट 2019 ते 3 एप्रिल 2024 पर्यंत राजस्थानमधून राज्यसभा सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी येथून बिनविरोध निवडणूक जिंकली.
अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्याबाबत महत्त्वाची भूमिका
काँग्रेसने मनमोहन सिंग यांना राजस्थानमधून उमेदवार बनवले तेव्हा अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री म्हणून मोठी भूमिका बजावली होती. मनमोहन सिंग यांच्या नॉमिनेशनपासून ते संपूर्ण काम त्यांनी पाहिले होते. सचिन पायलट त्यावेळी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी सर्व आमदारांनाही एकसंध ठेवले होते. त्यानंतर मनमोहन सिंग यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात आले नाही, तर मनमोहन सिंग यांनी पुन्हा राजस्थानमधून राज्यसभा सदस्य व्हावे, अशी काही काँग्रेस नेत्यांची इच्छा होती. मात्र, पुढे तसे झाले नाही.
देशाला आर्थिक संकटातून काढले बाहेर
डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढलं आणि नवी दिशा दिली. डॉ. मनमोहन सिंग 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले. त्यांनी पाच वेळा आसामचे प्रतिनिधित्व केले आणि 2019 मध्ये राजस्थानमधून राज्यसभा सदस्य झाले. 1998 ते 2004 पर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी डॉ. मनमोहन सिंग होते. तर 1999 मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यांना यश आले नाही.
हेदेखील वाचा : Dr Manmohan singh Death : देशाचं ‘अर्थ’चक्र निखळलं ; पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधींनी व्यक्त केला शोक