शिंदे गटात बोगस पक्षप्रवेश, मारूती मेंगाळेचा पक्षप्रवेश घोटाळा उघड
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. अनेक नेतेमंडळीही भाजप असो वा शिंदे गट यामध्ये प्रवेश करताना दिसत आहे. असे असताना आता शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. ‘मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज नाही. पण पक्षांतर्गत शिस्त नाही, मी याबाबत मांडणी केली आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
माजी खासदार हेमंत गोडसे यांनी बुधवारी (दि.16) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही. एकनाथ शिंदे यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे. मी त्यांच्यावर नाराज नाही. पण पक्षांतर्गत शिस्त नाही, मी याबाबत मांडणी केली आहे. मी जे सांगितले, त्यावर चर्चा होत नाही. पद वाटप, आणि संघटन, नियुक्त्या आणि योग्य सिस्टम नाही. एकनाथ शिंदे काम करताय पण जिल्ह्यातील मंत्र्यांनी त्या-त्या संघटनेत लक्ष घालायला पाहिजे. तर संघटना मजबूत होईल’.
तसेच आपल्याकडे एकच आमदार येतात. संघटन मजबूत आणि बांधणी झाली तर फरक पडेल. संघटनेला ताकद द्यायला पाहिजे. एकटे एकनाथ शिंदे काम करू शकत नाही. त्यांचा भार कमी केला पाहिजे. गुणवत्तेवर पदाधिकारी नेमले पाहिजे. एखाद्या पक्षात शिस्त असली की गटबाजी होत नाही. चर्चा चव्हाट्यावर जायला नको, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपमध्ये जाण्याचा विचार नाही
भाजपमध्ये जाण्याचा मी कोणताही विचार केलेला नाही. भाजपमध्ये संघटन चांगले आहे. तसे आपल्या पक्षात व्हायला पाहिजे, असे मी सांगितले होते. वरिष्ठ नेत्यांना मी सांगितले आहे. सामाजिक काम घेऊन मी श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना एकनाथ शिंदे न्याय देतील. गोष्ट कुटुंबाच्या बाहेर जायला नको आणि तेच होतं आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे
याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. काही विषय जिल्हा पातळीचे असतात. लहान विषयांसाठी राज्य पातळीवर जाण्याची गरज नको. माझ्या तिकिटासाठी उशीर झाला. त्याला समन्वय नाहीतर अनेक कारणे आहेत. नेते, उपनेते या सर्वांना सांगितले आहे, असे त्यांनी म्हटले.