भारत लोकशाही मानणारा देश बनला त्यामुळे आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो (फोटो - टीम नवराष्ट्र)
२६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. याचबरोबर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यावर्षी २६ जानेवारी रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आहे, जो आपल्या संविधानाच्या भावनेला आणि आपल्या लोकशाहीच्या ताकदीला अभिवादन करण्याचा दिवस आहे . कार्तव्य पथावरील भव्य परेडपासून ते ‘वंदे मातरम’च्या १५० वर्षांच्या वारशापर्यंत, २०२६ हे वर्ष खोलवर चिंतन आणि राष्ट्रीय अभिमानाचे वर्ष आहे.
26 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
26 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
26 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






