शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीची केल्याने विजय वडेट्टीवार आक्रमक (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुतीला एकतर्फी असे पूर्ण यश मिळाले. तसेच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. यानंतर दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादीच्या गटामध्ये तू तू मैं मैं होताना दिसली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे. शरद पवार यांचा अजित पवार यांनी दैवत म्हणून उल्लेख केला आहे. यावरुन आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर प्रतिक्रिया देत महायुतीवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांना दैवत म्हणणाऱ्या अजित पवारांचा वडेट्टीवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, परिस्थितीनुसार सगळे बदलतात, दिवस दूर नाही, तीन वर्षांनी ते कुठं दिसतील याचा अंदाज येणं सुरू झालं आहे. स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे. याची तयारी दोन्ही पक्ष करणार नाही तर अस्तित्व शून्य अशी परिस्थिती निर्माण होईल. दैवत म्हणून उल्लेख हा काकांची पुण्याई त्यांचा मागे आहे, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये देखील कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, “महाराष्ट्रमध्ये धावणारी लालपरीच्या 70 ते 80 टक्के गाड्या नॉन एसी आहेत. त्या बसमध्ये बसू सुद्धा शकत नाही. पण चालक वाहक चटके सहन करत आहे, या गाड्या जुन्या झाल्याने अधिक तापतात. यात एसटी कर्मचारी यांचा पगार कपात म्हणजे जखमींवर मीठ चोळणे आहे, जीवाशी का खेळता असाही सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. वाहकांना पाणी मिळत नाही, सोयी नाही, सेवा करण्याचं काम ते करतात, सरकारची ऐपत नसताना योजना दिल्या कशाला, त्यांचा भावनाशी खेळू नये,” असे स्पष्ट मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
कॉंग्रेसचे अधिवेशन देखील पार पडले आहे. याबाबत मत व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले की, “देश स्वतंत्र होत असताना इंग्रजांसोबत असलेले सत्तेत बसलेले आहे. अनेक पुस्तकातून दाखला मिळाला आहे. RSS स्थापन करणारे इंग्रजांबरोबर राहून अजून 200 चारशे वर्ष गुलामगिरी सहन करू. पण हे स्वातंत्र नको ज्यात SC-ST शूद्र लोकांबरोबर समानतेची मागणी आणि अधिकार मिळत असेल तर हे नको आहे. असे गोळवकलर पुस्तकात मांडले आहे, यात नवीन काही नाही. इंग्रजांच्या विरोधात सर्व समाज लढत असताना हे इंग्रजांच्या पाठीशी उभे होते हे सत्य आहे. स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले,” असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई दहशदवादी हल्ल्यामध्ये रेकी करणारा तहव्वुर राणाला भारतामध्ये आणण्यात आले आहे. याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, “आनंद आहे… आज जर आतंकवादी राणाला आणत असतील तर दाऊदला का आणले नाही? वर्ष गायकवाड बोलल्यात. ती हिम्मत का दाखवत नाही. या बॉम्बस्फोट मागे कोण होतं हे सर्वांना माहीत आहे. जवाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला आणावे. महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आणून राजकारण करू नये, त्याला फाशी दिली पाहिजे. थोड्या मतांसाठी पोळी शेकू नये. 15 वर्षे लागले. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये त्याचा उपयोग करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील. जुमले बाजीकरून निवडणुका जिंकतात,” असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.