बिहार विधानसभा निवडणूक 2025 (फोटो- सोशल मीडिया)
बिहार विधानसभा निवडणूक होणार रंगतदार
तेजस्वी यादव विरुद्ध सतीश कुमार यादव यांच्यात लढत
14 नोव्हेंबर जाहीर होणार निवणुकीचा निकाल
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. दोन टप्प्यात मतदान आणि 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 101 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एनडीए विरुद्ध अन्य विरोधी पक्ष अशी लढत होणार आहे. मात्र या सर्वामध्ये राघोपूर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे.
राघोपूर मतदारसंघात तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध भाजपने सतीश कुमार यादव यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान एनडीए विरुद्ध अन्य विरोधी पक्ष अशी लढत होणार आहे. बिहारमध्ये यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. सर्वच पक्षांसाठी यंदाची निवडणूक महत्वाची असणार आहे.
कोण आहेत सतीश कुमार यादव?
सतीश कुमार यादव हे भाजपचे राघोपूर मतदारसंघाचे उमेदवार आहेत. सतीश कुमार यादव राघोपूरमध्ये तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात राजद पक्षातून केली होती. 2005 मध्ये सतीश कुमार यादव हे जनता दल युनायटेड (जदयू) मध्ये सामील झाले होते.
2005 मध्ये सतीश कुमार यादव हे राबडी देवी यांच्याविरुद्ध निवडणूक हरले होते. मात्र 2010 मध्ये सतीश कुमार यादव यांनी राघोपूरमध्ये राबडी देवी यांना तब्बल 13 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले होते. मात्र पुन्हा एकदा 2015 मध्ये सतीश यादव तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध निवडणूक हरले.
काय आहे राघोपूर मतदारसंघांचा इतिहास
राघोपूर विधानसभा मतदारसंघ बिहारच्या वैशाली जिल्ह्यात येतो. या मतदारसंघाने बिहारला अनेक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिले आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या परिवाराचा हा बालेकिल्ला समजला जातो. लालू प्रसाद यादव यांनी 1995 ते 2000 असे दोन वेळेस विजय प्राप्त केला. तर त्यांची पत्नी राबडी देवी तीन वेळेस या मतदारसंघातून जिंकून आल्या आहेत.