कधी कुंडली तर कधी अंकशास्त्र, या सगळ्यावरुन माणसाच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्याचबरोबर तुमचा जन्मदिवस इतकंच नाही तर तुमच्या जन्ममहिन्यानुसार देखील व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो याचा ताळमेळ लावणं शक्य असतं. नुकताच सप्टेंबर महिना सुरु झाला आहे या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दल जाणून घेऊयात…
असं म्हटलं जातं की, सप्टेंबर महिन्यात जन्म झालेल्या जास्तीत जास्त व्यक्तींची रास ही कन्या आणि तूळ असते. या महिन्यात जन्मलेल्या 23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर या कालावधीत जन्मलेली बहुतांश जणांची रास कन्या आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीचे 15 दिवस आणि त्यानंतरचा संपूर्ण सप्टेंबर महिना तूळच्या अमंलाखाली अनेकजण येतात.
शिस्तप्रिय आणि व्यावहारिक: ही मंडळी त्यांच्या आयुष्यात अतिशय शिस्तप्रिय असतात.कुठलीही गोष्ट मनात आली आणि लगेच केली असं या मंडळींच्या बाबतीत होत नाही. ही माणसं काही करण्याआधी त्याचं नियोजन करतात. वास्तववादी दृष्टिकोन ठेवतात. काम कितीही अवघड असलं तरी ते नीट नियोजन करून पूर्ण करतात.
बुद्धीमत्ता : या माणसांची निरीक्षणशक्ती प्रभावी असते. छोट्या छोट्या गोष्टीकडे ते बारकाईने लक्ष देतात आणि परिस्थितीचा नीट विचार करून निर्णय घेतात.
कष्टाळू आणि जबाबदार : कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि कष्टपूर्वक करणं ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे त्यांना इतरांचा विश्वास सहज मिळतो.
संवेदनशील पण संयमी: सप्टेंबरमध्ये जन्माला आसेल्या व्यक्ती बाहेरून स्थिर आणि गंभीर दिसतात पण तेवढ्यातच्या स्वभावाने खूप भावनिक आणि संवेदनशील असतात. ते सहज दुखावले जात नाहीत, मात्र दुखावले गेले तर त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होतो.
सौंदर्य आणि नीटनेटकेपणा : सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक स्वच्छता, नीटनेटकेपणा याला जास्त प्रधान्य देतात. समाजात वावरताना नीटनेटकं दिसणं, चांगले कपडे यासगळ्याकडे यांचा जास्त कल असतो.
सामाजप्रिय़ आणि निवडक नाती जपणारे – हे लोक सहज कुणाशीही जुळवून घेत नाहीत. त्यांना थोडा वेळ लागतो, पण एकदा कुणाला जवळ घेतलं की ती नाती खूप काळ टिकवतात. सहजा यांना पटकन कोणालाही जवळ करता येत नाही,मात्र नाती निभावण्यात ही माणसं अग्रेसर असतात.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.