फोटो सौजन्य- pinterest
आपल्या घरातील तुळशीचे रोप हे फक्त रोप नसून ते धार्मिक आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते. असे म्हटले जाते की, ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि घरामध्ये शांती आणि आनंदाचे वातावरण राहते. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी या दोघांचेही आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. तुळशीचा वापर केल्यामुळे काही उपाय करणे खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला आर्थिक अडचणी, करिअरमधील अडथळे किंवा मानसिक ताण यासारख्या समस्या येत असतील तर तुळशीचा वापर करून काही उपाय करणे फायदेशीर ठरतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या
जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल किंवा तुमची बचत टिकत नसेल, तर तुळशीचा हा उपाय विचारात घ्या. काही वाळलेली तुळशीची पाने घ्या, त्यांना लाल कापडात बांधा आणि ती तुमच्या तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा. या उपायाने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात पैशाचा प्रवाह वाढतो. असे मानले जाते की या उपायाने आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात आणि घरात समृद्धी येते.
सकाळी लवकर तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते, परंतु पाण्यात हळद टाकल्याने त्याची प्रभाविता अनेक पटीने वाढते. शास्त्रांनुसार, तुळशीला हळद आणि पाण्याचे मिश्रण अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. यावेळी तुळशीसमोर तुमच्या इच्छा व्यक्त केल्यास त्या पूर्ण होतात. हा उपाय केल्यामुळे जीवनामध्ये सकारात्मक बदल होतो आणि रखडलेले काम हळूहळू पूर्ण होऊ लागते.
तुळशीच्या झाडाजवळ रोज संध्याकाळी तूप किंवा तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात यश हवे असल्यस तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावणे आणि भगवान विष्णूच्या नावाचे नामस्मरण करणे चांगले मानले जाते. हा उपाय केल्याने आर्थिक बळ मिळत नाही तर घरात आनंद आणि शांततेचे वातावरण राहते.
शास्त्रानुसार तुळशीपूजनाच्या वेळी भगवान विष्णूला चंदनाचा टिळा आणि देवी लक्ष्मीला लाल चुनरी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच, नैवेद्यात तुळशीची पाने समाविष्ट करा. या उपायामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते, वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि सुसंवाद येतो. यामुळे नात्यात गोडवा येतो आणि जीवनात शांती येते.
जर तुमच्या घरात सतत आर्थिक समस्या येत असल्यास तुळशीच्या झाडाखाली चांदी किंवा तांब्याचे नाणे ठेवा. हे नाणे स्वच्छ आणि शुद्ध असल्याची खात्री करा. हा उपाय आर्थिक अडथळे दूर करतो आणि तुमच्या घरात आर्थिक स्थिरता आणतो.
वाळलेल्या तुळशीची पाने कधीही फेकून देऊ नयेत. त्यांना लाल किंवा पिवळ्या कापडात गुंडाळा आणि घराच्या मंदिरात ठेवा. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि घरात शांती आणि आनंद टिकून राहतो. वाळलेल्या तुळशीच्या पानांनी पाण्यात आंघोळ केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






