फोटो सौजन्य- istock
प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात आनंद हवा असतो. परंतु कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. असेही घडते की, आपण कठोर परिश्रम करतो, पण मनात अशांतता राहते, आजार परत येत राहतात किंवा पैसा टिकत नाही. यावेळी घरातील वातावरण आणि काही गोष्टी घरात ठेवल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो. घरात कोणत्या गोष्टी ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा येईल आणि आर्थिक समस्या दूर होईल, जाणून घ्या
पिवळी मोहरी ही खूप सोपी पण प्रभावी गोष्ट आहे. दर गुरुवारी ती घरात हलकेच पसरवा आणि 15 ते 20 मिनिटांनी झाडू मारुन आणि घर पुसून स्वच्छ करा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सुख-शांती येते. याशिवारी तुमच्या तिजोरीमध्ये देखील पिवळी मोहरी ठेवता येते. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.
भीमसेनी कापूर फक्त जाळण्यासाठी नाही तर डिफ्यूझरमध्ये वापरण्यासाठी आहे. घरात हवा शुद्ध करण्यासोबतच सुंगधही पसरवतो. दिवा लावल्यानंतर कापूर जाळून त्याचा कधीही वापर करु नका. कापूर जाळल्यानंतर त्याचा वास घरभर पसरु द्या घराच्या अग्नि दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेने ठेवणे चांगले मानले जाते.
स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर योग्य दिशेनुसार ते काढून योग्य ते रंग द्या. उदाहरणार्थ, उत्तरेला निळ्या रंगाचे स्वस्तिक, पूर्वेला हिरवे, दक्षिणेला लाल आणि पश्चिमेला पांढरे किंवा राखाडी रंगाचे स्वस्तिक काढणे चांगले. यामुळे घरात उर्जेचा समतोल राखला जातो. तसेच स्वस्तिक काढल्याने घरात संपत्ती, आनंद आणि सौभाग्य आणते आणि वाईट शक्तींना दूर ठेवते.
रात्रभर चांदीच्या भांड्यात पाणी उत्तर-ईशान्य दिशेने ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे उपाय शरीराला ताजेतवाने करते आणि रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढवते. जर दिशा योग्य असेल तर हा छोटासा बदल तुमचे आरोग्य सुधारू शकतो.
जर घरातील तिजोरी योग्य दिशेला ठेवली असल्यास पैशाची बचत वाढू शकते. तिजोरी ही दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर ठेवा आणि त्याचे तोंड उत्तरेकडे असावे. तसेच तिजोरीमध्ये पिवळी मोहरी, थोडा कापूर आणि एक छोटा स्वस्तिक ठेवा. हे संयोजन संपत्ती आकर्षित करते.
घरात सकारात्मक उर्जेचा परिणाम होण्यासाठी घरात एअर प्रेशनर, परफ्यूम यांसारख्या गोष्टींचा वापर करता येऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)