Japan Earthquake : जपानमध्ये पहाटे जोरदार भूकंप ; 6.2 तीव्रतेच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट (फोटो सौजन्य: iStock)
Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
या भूकंपामुळे जपानची शिकांन्सेन बुलेट ट्रेन सेवा तात्पुरती थांबण्यात आली आहे. कोणत्याही जीवितहानीची किंवा नुकसानीचे संकेत नाहीत. परंतु काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच इमारतींना किरकोळ नुकसान झाले आहे. सध्या कोणत्याही मोठ्या प्रकारच्या धोक्याचा किंवा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
सध्या जपानचे संरक्षण मंत्रालय, संभाव्य नुकसानीचे मूल्यांकन करत आहे. यासाठी हवाई तपासणी सुरु आहे. तसेच सरकारने स्थानिक अधिकारी आणि आपत्ती संस्थांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. याशिवाय नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आणि कोणतीही हालचाल जाणवल्यास आपत्ती व्यवस्थापन संस्थांना संपर्क साधण्याचे आवाहान करण्यात आले आहे. सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग संपूर्ण परिस्थितीवर लक्ष्य ठेवून आहेत.
जपानमध्ये अलीकडेच शिमाने प्रांतात भूंकप झाला होता. याची तीव्रता देखील ६.२ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती.अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनूसार, हा भूकंप ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.
जपान हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. येथे पॅसिफिक, युरेशियन, फिलीपिन्स आणि उत्तर अमेरिकन या टेक्टॉनिक प्लेट्स असून या सतत एकमेकांवर आदळत असतात. यातून घर्षण तयार होते आणि यामुळे भूकंपीय क्रियाकलाप होतात. यामुळे जपानमध्ये सतत भूकंप होत असतात. यामुळे त्सुनामीचा आणि ज्वालामुखीचा देखील मोठा धोका असतो. हा देश सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे.
त्सुनामीचा धोका असतो. यामुळे जपानने या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी अनेक तंत्रज्ञान विकसित केले आहेत. त्सुनामीचा धोका टाळण्यासाठी जपानने १५ मीटर उंच वक्र आकाराची भिंती बांधली आहे. ही भिंत अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की, त्सुनामीच्या लाटा आदळतील पण शहरात शिरणार नाहीत.
📢緊急地震速報
発表時に取るべき行動とは? 緊急地震速報が発表されてから実際に強い揺れが来るまでは、十数秒から数十秒です💥 周りの人に声をかけながら、
「周囲の状況に応じて、速やかに慌てずに、まず身の安全を確保する」ことが重要です。https://t.co/VwdFdD1fEW@JMA_kishou pic.twitter.com/YHbyY7srXi — 政府広報オンライン (@gov_online) January 6, 2026






