फोटो सौजन्य- istock
शिवलिंगाद्वारे भगवान शंकराची पूजा केली जाते आणि जर तुम्ही शिवलिंगावर 108 धान्य अर्पण केले तर तुम्हाला वेगवेगळे फळ मिळते. देवांचा देव म्हणजे महादेव म्हणजेच भगवान शंकर, ज्यांना भोलेनाथ आणि शिव इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. शिवलिंग हे प्रथम पूज्य भगवान गणेशाचे जनक कैलाशपतीच्या पूजेसाठी सर्वोत्तम माध्यम आहे.
मंदिरांमध्ये लोक शिवलिंगाची पूजा करतात आणि दुधाचा अभिषेक करून आपली इच्छा व्यक्त करतात. भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगतात की, जर तुम्ही शिवलिंगावर 5 वेगवेगळ्या धान्यांचे 108 दाणे अर्पण केले तर ते तुम्हाला 5 वेगवेगळ्या समस्यांपासून मुक्ती देऊ शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की दाणे कसे अर्पण करायचे आणि यासाठी कोणते धान्य वापरायचे आहे अर्थात नक्की ते धान्य कोणते आणि त्यावर उपाय काय असावेत? जाणून घ्या
शिवलिंगावर 108 दाणे गहू अर्पण केल्यास मान मिळतो. यासोबतच जर तुम्ही निपुत्रिक असाल आणि तुम्हाला संततीचे सुख मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हे उपाय केल्याने तुम्हाला संतती प्राप्त होईल. खरं तर आजही समाजात तुम्हाला संतान झाल्याशिवाय बरेचदा काही ठिकाणी मान मिळत नाही आणि तुमचीही संतान होण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की शिवलिंगावर गहू अर्पण करावेत.
हेदेखील वाचा- पन्ना रत्न कोणी परिधान करावे? योग्य नियम, पद्धती आणि फायदे आणि तोटे जाणून घ्या
जर तुम्हाला पैशाची कमतरता भासत असेल आणि अनेक उपाय करूनही तुम्हाला फायदा होत नसेल तर शिवलिंगावर 108 कच्चे तांदूळ अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला संपत्ती मिळेल. घरात नेहमीच तांदूळ उपलब्ध असतात. त्याचा तुम्ही वापर करून घ्यावा आणि मनोभावे अर्पण करावे.
जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि अनेक प्रयत्न आणि उपचार करूनही आराम मिळत नसेल तर तुम्ही शिवलिंगावर जवाचे 108 दाणे अर्पण करावे. यामुळे तुम्हाला आजारांपासून आराम मिळेल हे लक्षात घ्या
हेदेखील वाचा- मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया
जर तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाशी संबंधित दोष असतील आणि तुम्हाला ते दूर करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 108 दाणे मसूर घेऊन शिवलिंगाला अर्पण करावे लागतील. असे केल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते.
जर तुम्हाला जीवनात खूप त्रास होत असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यासोबत हे काही पाप कृत्यामुळे घडत आहे, तर शिवलिंगावर 108 दाणे पांढरे तीळ अर्पण करा. यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होऊ शकतात.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.