फोटो सौजन्य- pinterest
संक्रमण म्हणजे ग्रहांची हालचाल किंवा त्यांच्या राशीत होणारे बदल. ही एक ज्योतिषीय घटना आहे जिथे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात आणि याचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो.
प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा वेग आणि संक्रमणाचा कालावधी हा वेगवेगळा असतो. जसे की चंद्राचा वेग सर्वात जास्त आहे आणि शनिचा सर्वात मंद. कुंडलीमध्ये ग्रहाच्या स्थितीनुसार ग्रहांचे होणारे संक्रमण हे विविध प्रकारे परिणाम करतात. यावेळी बुध ग्रहाचे संक्रमण शुक्रवार, 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
वृश्चिक राशीतील बुधाचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांच्या भागीदारी आणि नातेसंबंधांवर महत्त्वपूर्ण परिणाम करणार आहे ज्यामुळे त्यांचे सातवे घर सक्रिय होईल. या काळामध्ये करिअर आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. तर व्यवससाय आणि व्यापारामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तसेच या काळामध्ये नातेसंबंधामधील संबंध सुधारतील आणि अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
वृश्चिक राशीमध्ये बुधाच्या संक्रमणाचा वृषभ राशीच्या लोकांवर संमिश्र प्रभाव पडेल. ज्याचा संबंध वैवाहिक जीवनाशी असेल. या काळामध्ये तुमच्यामधील नातेसंबंध दूर होतील. दरम्यान परस्पर हट्टीपणा देखील वाढू शकतो, म्हणून संयम आणि लवचिकता आवश्यक असेल.
वृश्चिक राशीत बुध ग्रहाचे संक्रमण होत असल्याने करिअर आणि व्यवसायासाठी हा काळ सकारात्मक राहील. या काळामध्ये तुमच्यातील व्यक्तिमत्व सुधारेल. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळू शकते.
या काळात व्यवसायासाठी तुम्ही नवीन योजनेची सुरुवात करु शकता. नवीन व्यावसायिक संबंध बनवू शकता आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वृश्चिक राशीतील बुधाच्या संक्रमणाचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर मिश्रित होऊ शकतो. मात्र हे संक्रमण आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्यात आणि दैनंदिन सवयींमध्ये स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
वृश्चिक राशीत बुधाचे होणारे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर मिश्रित परिणाम करेल, ज्यामध्ये उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात आणि व्यवसायात नफा होऊ शकतो.
या संक्रमणामुळे भागीदारी आणि व्यावसायिक संबंध सुधारतील. मात्र कोणत्याही आर्थिक निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगणे आणि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)