फोटो सौजन्य- pinterest
शनिवार, 31 जानेवारी रोजी बुध ग्रह मंगळाच्या अधिपत्याखाली असलेल्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात या नक्षत्राला अत्यंत शुभ मानले जाते. बुध ग्रहाचा धनिष्ठामध्ये प्रवेश काही राशींना समृद्धी आणू शकतो. बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, संवाद, करिअर आणि संपत्तीसाठी जबाबदार ग्रह आहे. तर धनिष्ठा नक्षत्र हे संपत्ती, प्रतिष्ठा, यश आणि जलद प्रगतीचे प्रतीक मानले जाते.या राशींना त्यांच्या करिअरमध्ये, कौटुंबिक जीवनात आणि सामाजिक जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात. या संक्रमणाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर शुभ तर काही राशींच्या लोकांवर अशुभ होऊ शकतो. बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे जाणून घ्या
बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. फेब्रुवारीमध्ये तुमच्या योजना यशस्वी होतील. तुमच्या पालकांकडून मिळालेला पाठिंबा अनेक अपयशांना सुधारण्यास मदत करू शकतो. जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर फेब्रुवारीमध्ये तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल असू शकते. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही धार्मिक कार्यातदेखील सहभागी होऊ शकतात. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात.
कन्या राशीचा स्वामी बुध, नक्षत्र बदलानंतर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या क्षमता तुमच्या सहकाऱ्यांना प्रभावित करू शकतात. तुमच्या आरोग्यातही सकारात्मक बदल दिसून येतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फादेशीर राहील.
बुध राशीत बदल झाल्यानंतर धनु राशीच्या लोकांना ऊर्जा वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या ज्ञानाने इतरांना प्रभावित करू शकता. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला असेल तर निकाल तुमच्या बाजूने येऊ शकतात. तुमची एखाद्या अनोळखी व्यक्तीशी ओळख होऊ शकते आणि त्यांच्याकडून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. काही धनु राशीच्या लोकांना त्यांच्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा देखील मिळू शकतो. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सामान्य राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: बुध धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश 31 जानेवारी रोजी प्रवेश करणार आहे
Ans: धनिष्ठा नक्षत्राचे स्वामी मंगळ आहेत. त्यामुळे बुध–मंगळ युतीमुळे धाडसी निर्णय, आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग तयार होतात.
Ans: बुधाच्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेशामुळे वृषभ, कन्या आणि धनु राशीच्या लोकांना फायदा होणार आहे






