फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवार, 18 जुलै रोजी बुध कर्क राशीतून वक्री होत आहे. याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होताना दिसून येणार आहे. या संक्रमणामुळे तुमच्या नातेसंबंधामध्ये असलेले मतभेद दूर होतील.
कर्क राशीमध्ये बुधाची होत असलेल्या वक्रीचा परिणाम काही राशीच्या लोकांवर सकारात्मक होणार आहे. तर काही राशीच्या लोकांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. ज्या लोकांच्या नातेसंबंधामध्ये मतभेद झाले असतील तर ते दूर होण्यास मदत होऊ शकते. या लोकांना आत्मपरीक्षणाला अधिक प्रोत्साहन द्यावे लागेल.
मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये बुधाची स्थिती सहाव्या आणि नवव्या घरात आहे तर कर्क राशीच्या सातव्या घरात असल्याने बुध स्थित असेल. बुधाच्या या संक्रमणामुळे जुने दुरावलेले नातेसंबंध सुधारण्यास मदत होऊ शकते. वैयक्तिक संबंध सुधारु शकते. त्यासोबत व्यवसायातही वाढ होऊ शकते. संवादात विलंब आणि गोंधळ होण्याची शक्यता आहे. मात्र या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तसेच हे लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहतील त्यात त्यांना अपेक्षित यश मिळेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल.
कुंभ राशीच्या कुंडलीमध्ये पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी बुध आहे. कर्क राशीच्या सहाव्या घरात बुध स्थित असल्याने बाराव्या भावात दृष्टी ठेवेल. बुधाच्या वक्रीमुळे तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. जुने कर्ज फेडण्यासाठी पावले उचलली जाऊ शकतात. तसेच तुमच्या जीवनात मानसिक गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या लोकांना धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील. जे लोक नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल.
मीन राशीच्या कुंडलीमध्ये चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. कर्क राशीच्या पाचव्या घरामध्ये बुध स्थित असल्याने तो अकराव्या भावात दृष्टी ठेवेल. बुधाच्या वक्रीमुळे व्यक्तीच्या सर्जनशीलतेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यांच्या मनामध्ये मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. जुन्या योजनेतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमची एखाद्या अनोळखी व्यक्तीची ओळख होऊ शकते ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)