फोटो सौजन्य- pinterest
केतूच्या नक्षत्र बदलाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. तसेच ते धार्मिक कार्यावर लक्ष केंद्रित करतील. रविवार, 20 जुलै रोजी केतू पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात संक्रमण करणार आहे तर राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्रात संक्रमण करेल. हे दोन्ही ग्रह छाया ग्रह असल्याने ते आपले नक्षत्र आणि राशी एकत्रितपणे बदलत राहतात. केतूला मोक्ष, भूतकाळातील कर्म, अध्यात्म, अलिप्तता इत्यादींचे प्रतिनिधित्व करतो. राहू आणि केतू नेहमी विरुद्ध दिशेने फिरत असता त्यावेळी त्याचा परिणाम राशी आणि नक्षत्र बदलावर होतो. या बदलाचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होताना दिसून येतो. या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांना केतूच्या संक्रमणाचा फायदा होणार आहे. कौटुंबिक समस्या देखील कमी होतील. वैवाहिक जीवनात येत असल्यास समस्या होत असल्यास त्या दूर होतील. केतुच्या या प्रभावामुळे प्रत्येक कामामध्ये करणारे परिश्रम, प्रामाणिकपणा, मेहनत यामुळे ते यशस्वी होतात. तसेच हे लोक धार्मिक कार्यात रस घेतात. तुम्ही नातेवाईक आणि मित्र परिवारासह धार्मिक सहलीला जाऊ शकतात.
पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होत असलेले केतुचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी हे लोक वाहन, जामीन, मालमत्ता इत्यादींची खरेदी करु शकतात. तसेच कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. आरोग्य चांगले राहील. नोकरी करणारे लोक आपले सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध राहतील.
पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात केतुचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. केतुच्या या शुभ प्रभावामुळे तूळ राशीच्या लोकांमधील सुख सुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसायामध्ये तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. तसेच तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. या लोकांचे आरोग्य देखील चांगले राहील.
केतुचे नक्षत्रातील संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. त्याच्या या संक्रमणाचा परिणाम या राशीच्या लोकांवर आर्थिकदृष्ट्या चांगला होणार आहे. ज्या लोकांची कामे अपूर्ण राहिलेली आहेत ती पूर्ण होऊ शकतात. या लोकांना करिअरमध्ये अनेक संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. धार्मिक कार्यामध्ये रस वाढेल.
केतूचे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. या लोकांचे नशीब बदलू शकते. करिअरमध्ये तुम्हाला अनपेक्षित प्रगतीच्या संधी मिळू शकतात. त्यासोबतच कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या व्यक्तिमहत्त्वामध्ये सुधारणा होईल. या लोकांना व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)