फोटो सौजन्य- pinterest
कालभैरव यांना भगवान शिवाचे भयंकर रूप मानले जाते. त्याच्या या रुपाची पूजा कालाष्टमीच्या दिवशी केली जाते. कालाष्टमीचे व्रत हे दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला पाळले जाते. यावेळी कालभैरवाचे भक्त उपवास ठेवतात तसेच त्यांची पूजा केली जाते. जुलै महिन्यातील कालाष्टमीचे व्रत कधी आहे, जाणून घ्या
पंचांगानुसार, कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात गुरुवार, 17 जुलै रोजी संध्याकाळी 07.08 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शुक्रवार, 18 जुलै रोजी संध्याकाळी 05.01 वाजता होईल. यावेळी निशा काळामध्ये कालभैरवाची पूजा केली जाते. निशा काळामध्ये पूजा करण्यासाठी मुहूर्त रात्री 12.07 ते 12.48 पर्यंत आहे.
कालाष्टमीच्या दिवशी सुकर्मा आणि शिववास यांचे शुभ योग तयार होत आहे. शिववास योग संध्याकाळी 07.08 वाजल्यापासून सुरु होत आहे. असे म्हटले जाते की, यावेळी देवी देवतांचे देव महादेव आणि देवी पार्वती कैलासावर राहतात. मान्यतेनुसार, शिववास योगामध्ये पूजा केल्याने साधकाला दुप्पट लाभ होतात, असे म्हटले जाते. त्यासोबतच सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात.
कालाष्टमी व्रताच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून आंघोळ करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे
त्यानंतर देव्हाऱ्याजवळ गंगाजल शिंपडावे.
एका चौरंगावर लाल कापड पसरवून कालभैरव आणि भगवान शिव यांची मूर्ती ठेवावी.
त्यासोबत भगवान कालभैरवाला पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.
पूजा झाल्यानंतर फळे, मिठाई यांचा नैवेद्य दाखवा.
त्यानंतर आरती करुन उपवास सोडा.
सूर्यदेवाला जल अर्पण करावे तसेच त्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला देणे देखील शुभ मानले जाते.
कालाष्टमी व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवासमोर चारही बाजू असलेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करा.
या दिवशी कालभैरवाला जिलेबीचा नैवेदय दाखवावा. तसेच कुत्र्याला चपाती किंवा भाकरी खायला द्यावी.
असे म्हटले जाते की, या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे भय आणि त्रास दूर होतात. तसेच भगवान भैरव आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि नकारात्मक शक्तींपासून वाचवतात. कालभैरवाची पूजा केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यासोबतच हे व्रत केल्याने शनि आणि राहू यांचा असलेला प्रभाव कमी होण्यास मदत होते. तसेच मासिक कालाष्टमीच्या दिवशी हे व्रत करुन काही उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)