फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवारचा दिवस. आजच्या दिवसाचा स्वामी शनि आहे जे गुरूच्या राशीमध्ये संक्रमण करताना चतुग्रही योग तयार करणार आहे. चंद्राचे संक्रमण दिवसरात्र धनु राशीत होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या संक्रमणामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. तसेच मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे धन योग तयार होईल. याबरोबरच शुक्र देखील आपले संक्रमण करणार आहे. चतुग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी फायदा होईल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत आजचा दिवस उत्तम राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. भागीदारीच्या कामातून तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी टीमवर्कमुळे तुम्हाला फायदा होईल. तुमची इच्छा पूर्ण झाल्याने तुम्ही खूश राहाल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायामधून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील. तुम्ही मुलांसोबत चांगला वेळ घालवू शकता.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना नफा मिळवण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला राजकीय संबंधांचा फायदा होऊ शकतो. अनुभवी आणि वरिष्ठ व्यक्तीचे सहकार्य आणि मार्गदर्शन तुम्हाला यश मिळवून देईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांसोबत एकत्र काम केल्याचा फायदा होऊ शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुम्हाला सर्व कामांमध्ये चांगले यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. मालमत्तेशी संबंधित कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्या मोठ्या भावंडांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. व्यवसायातील उत्पन्नामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सोने आणि धातूशी संबंधित काम करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होईल. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आणि तुमचे काम सुरळीतपणे पूर्ण होईल. कोणताही गोंधळ किंवा तणाव दूर होऊ शकतो. तुम्हाला वडिलांकडून अपेक्षित लाभ होऊ शकतो. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुमच्या उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होऊ शकते. यावेळी तुम्ही वाहनांची खरेदी करु शकता. जर तुमचे काम परदेशांशी संबंधित असेल तर तुम्हाला तिथून फायदा होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






