फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार 21 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य देव आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज चंद्राचे संक्रमण गुरूच्या धनु राशीमध्ये होत आहे. अशा वेळी चंद्र आणि गुरू यांच्यामध्ये समसप्तक योगामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. चंद्र आणि मंगळ यांच्यामध्ये युती होत असल्याने धन लक्ष्मी योग तयार होईल आणि पूर्वाषाढा नक्षत्रामुळे वृद्धी योग तयार होईल. आजचा रविवारचा दिवस सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबासाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तसेच आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला व्यवसायात खूप फायदा होईल. जे लोक कपडे आणि ज्वेलरीशी संबंधित आहेत अशा लोकांना अपेक्षित यश मिळेल. आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आज तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे हाताळू शकता. सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. वाहनांची खरेदी करू शकता. मालमत्ते संबंधित काही वाद असतील तर ते दूर होतील.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामानिमित परदेशात जाऊ शकता. नशिबाची तुम्हाला अपेक्षित साथ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल. परदेशात काम करणाऱ्यांना फायदेशीर संधी मिळेल. तुमच्यावरील तणाव दूर होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तुमची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता तुम्हाला जीवनाच्या अनेक क्षेत्रात फायदेशीर ठरेल. आज तुम्ही मित्रांसोबत आजचा वेळ घालवाल. कुटुंबामध्ये आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय क्षेत्रात असणाऱ्या लोकांना अपेक्षित फायदा होईल. हॉटेल आणि केटरिंगशी संबंधित कामात असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे आणि कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचे अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. मोबाईल फोन किंवा गॅझेटची तुम्ही आज खरेदी करु शकता. वैवाहिक जीवन चांगले राहील. तु्म्ही आज धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






