फोटो सौजन्य- istock
सर्वांनाचा रात्री झोपेमध्ये काही ना काही दिसतेच. त्यातील काही स्वप्ने क्वचित खरी देखील होतात. तर स्वप्नांचा काही लोकांच्या खोलवर परिणाम होतो. शास्त्रांध्ये विविध स्वप्नांचा उल्लेख केलेला आहे. असे मानले जाते की, यातील काही स्वप्न शुभ तर अशुभ स्वप्नाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अशी काही स्वप्ने आहे ती तुम्ही इतरांसोबत केव्हाही शेअर करु नये. जाणून घ्या अशी कोणती स्वप्न आहेत ती इतरांसोबत कधीही शेअर करु नये.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये पाण्याने भरलेला कलश दिसला तर त्याचा असा अर्थ होतो की तुम्हाला संपत्ती, आनंद आणि समृद्धीचे हे शुभ संकेत मानले जाते. परंतु तुम्ही हे स्वप्न इतरांना सांगितल्यास तुम्हाला शुभ प्राप्ती होण्यास उशीर होऊ शकतो. शास्त्रानुसार, स्वप्न पूर्ण होईपर्यंत ते कोणाशीही शेअर करु नये अगदी जवळच्या व्यक्तीसोबत सुद्धा.
स्वप्नात तुम्हाला रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली बाग दिसणे खूप शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होते की, तुम्हाला येणारे दिवस आनंदाचे आणि चांगल्या बातमीचे प्रतीक मानले जाते. परंतु जर तुम्ही हे स्वप्न कोणासोबत शेअर केल्यास तुम्हाला मिळणारा आनंद किंवा चांगल्या घडणाऱ्या घटना थांबू शकतात.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये देवी देवता दिसणे म्हणजे आशीर्वादाचे लक्षण मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुम्हाला होत असलेले त्रास आता संपणार आहेत किंवा तुम्हाला असलेल्या अडचणी आता संपतील. परंतु जर तुम्ही असे स्वप्न एखाद्या बरोबर शेअर केल्यास तुमची आध्यात्मिक ऊर्जा कमी होऊ शकते आणि समस्येचे निराकरण होण्यास उशीर होऊ शकतो.
जर तुम्हीसुद्धा स्वतःला स्वप्नात राजा किंवा मोठा अधिकारी म्हणून पाहत असाल तर ते तुमच्या जीवनात मोठ्या जबाबदाऱ्या आणि यश येणार असल्याचे संकेत आहे. हे स्वप्न आत्मविश्वास आणि नेतृत्वाकडे वाटचाल दर्शवते. मात्र, तुम्ही हे स्वप्न इतरांसोबत शेअर केल्यास कोणीतरी तुमच्या योजनांना हानी पोहोचवू शकते किंवा तुमच्या विचारांना कमी लेखण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून, अशी स्वप्ने कोणासोबतही शेअर करु नये.
स्वप्नशास्त्रात अशा काही स्वप्नांचा उल्लेख केलेला आहे की त्या स्वप्नांमुळे तुमच्या अंगी असलेली ऊर्जा विशेष आणि नाजूक असते. जर तुम्ही एखाद्यासोबत स्वप्न शेअर करत असाल तर त्या उर्जेचा प्रभाव कमकुवत होऊ शकतो. स्वप्न शेअर केल्यामुळे कधीकधी समोरची व्यक्ती तुमच्या बोलण्याची खिल्ली उडवू शकते, ज्यामुळे शुभ संकेतांचा परिणामाचा उलटा परिणाम होऊ शकतो. म्हणून, स्वप्न पूर्ण होईपर्यंत गप्प राहणे तुमच्यासाठी शहाणपणाचे आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)