फोटो सौजन्य- pinterest
माणूस झोपेमध्ये काही ना काही स्वप्न बघतात. तर ही स्वप्ने शुभ असतात तर काही स्वप्न अशुभ असतात. स्वप्नामध्ये देवतांच्या संबंधित गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. असे देखील म्हटले जाते की, श्रावण महिन्यात महादेव आणि देवीची पार्वतीची पूजा केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी वाढते. यावेळी जर तुम्हाला स्वप्नात ब्रह्म मुहूर्तावर असे काही स्वप्न दिसल्यास तुमचे नशीब बदलू शकते. महादेवांचा आशीर्वाद भक्तांवर नेहमी कायमच राहतो. स्वप्नात कोणत्या गोष्टी पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या
असे म्हटले जाते की, जर एखाद्याला ब्रम्ह मुहूर्तावर कोणती स्वप्ने पडल्यास ती पूर्ण होतात. ती स्वप्ने आपल्या जीवनासंबंधित काही संकेत देत असतात. सनातन धर्मामध्ये ब्रम्ह मुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात महादेवांच्या संबंधित काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. अशा काही गोष्टी दिसल्यास व्यक्तीचे नशीब चमकते आणि आर्थिक समस्या देखील दूर होण्यास मदत होते. यामुळे महादेवाचा भक्तावर आशीर्वाद राहतो.
जर तुम्हाला ब्रम्ह मुहूर्तावर स्वप्नामध्ये नंदी म्हणजेच बैल घरासमोर उभा असणारा दिसणे म्हणजे तुमचे नशीब बदलू शकते. याचा अर्थ असा होतो की महादेव तुमच्यावर कृपा होणार आहे.
महादेवाच्या हातामध्ये असलेला डमरु तुम्हाला स्वप्नात दिसणे हे शुभ लक्षण मानले जाते. डमरु स्वप्नात दिसणे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी राहणार आहे. त्याचसोबत करिअर आणि व्यवसायात देखील तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.
ब्रह्म मुहूर्तामध्ये स्वप्नात महादेवाची पूजा करताना पाहणे हे शुभ संकेत मानले जाते. असे मानले जाते, स्वप्नात महादेव दिसणे म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या आणि दुःख दूर होणे.
स्वप्नामध्ये साप दिसणे खूप खास मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या घरामधील असलेली आर्थिक समस्या दूर होतील. तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल.
जर एखाद्याला स्वप्नामध्ये त्रिशूळ दिसणे हे शुभ लक्षण मानले जाते. स्वप्नात त्रिशूळ दिसणे म्हणजे व्यक्तीच्या जीवनात सुरु असणाऱ्या समस्या दूर होणे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)