फोटो सौजन्य- pinterest
तुम्हालाही स्वप्नामध्ये विचित्र, पुनरावृत्ती होणारे अशी स्वप्न दिसतात का? ज्योतिषशास्त्र आणि स्वप्नशास्त्रांच्या म्हणण्यानुसार, स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचे काही विशेष संकेत असतात ज्यामुळे भविष्यामध्ये संपत्ती, वैभव आणि समृद्धीचे दरवाजे उघडण्याकडे निर्देश करतात. अशी काही स्वप्ने आहेत ती दिसणे म्हणजे श्रीमंत होण्यापूर्वी मिळणारी संकेत असल्याचे म्हटले जाते. उदाहरणार्थ कुबेराचे भांडे पकडण्यापूर्वी अशी स्वप्ने येतात. स्वप्नामध्ये अशा काही गोष्टी दिसल्यास समजून जा की देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. श्रीमंत होण्यापूर्वी स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसतात, जाणून घ्या
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात तुमचा इष्टदेव दिसत असेल तर ते खूप शुभ मानले जाते. स्वप्नात इष्टदेव पाहण्याचा अर्थ असा होतो की जीवनात ज्या काही समस्या येत आहेत त्या दूर होणार आहेत आणि तुमचे सर्व काम त्वरित पूर्ण होतील. अशा वेळी तुम्ही सकाळी लवकर उठून त्या देवतेचे ध्यान करा आणि नतमस्तक व्हा. त्यासोबतच गरजूंना दान करा.
जर तुम्हाला स्वप्नात चांदीची भांडी दिसत असल्यास ते शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुमची आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे. तसेच तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळतील. हे स्वप्न पडणे म्हणजे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे. जर तुम्हाला असे स्वप्न पडत असेल तर सकाळी देवी लक्ष्मीला नमन करा.
जर तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला दुधाने आंघोळ करताना पाहत असाल तर ते एक शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कराल.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये सरडा, हत्ती, झाडू, कमळाचे फूल, पक्ष्याचे घरटे इत्यादी दिसत असेल तर ते शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. तसेच तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. या स्वप्नांना समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते. त्यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होईल.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये पाऊस पडताना दिसत असेल तर ते एक शुभ संकेत असल्याचे मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या जीवनामध्ये पैशांचा वर्षाव होणार आहे. त्याचबरोबर स्वप्नात कलश किंवा पाण्याने भरलेला घागर म्हणजे संपत्तीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. अशी स्वप्न दिसणे म्हणजे सुख समृद्धीचे लक्षण मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)