फोटो सौजन्य- istock
दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतूट बंधनाचे प्रतीक असलेला सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, सुरक्षिततेसाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात. यावेळी भाऊ देखील आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. रक्षाबंधनाला भावाला त्याच्या राशीनुसार बांधा या रंगांची राखी, जाणून घ्या
रक्षाबंधनाच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी भावाला लाल रंगांची राखी बांधावी. त्यामुळे नात्यामध्ये गोडवा टिकून राहील.
रक्षाबंधनाच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना पांढऱ्या किंवा गुलाबी रंगांची राखी बांधावी. त्यामुळे भावाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
रक्षाबंधनाच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना हिरव्या रंगाची राखी बांधावी त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत प्रगती होण्यास मदत होईल.
रक्षाबंधनाच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांना पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची राखी बांधावी. त्यामुळे भावाचे वाईट नजरेपासून रक्षण होते असे म्हटले जाते.
रक्षाबंधनाच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना लाल किंवा केशरी रंगाची राखी बांधावी. त्यामुळे भावाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
रक्षाबंधनाच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांना हिरव्या रंगाची राखी बांधावी. त्यामुळे भाऊ बहिणीमधील नाते चांगले राहते. प्रेम वाढते.
रक्षाबंधनाच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांना गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची राखी बांधावी. त्यामुळे भावाला प्रत्येक कामात यश मिळेल.
रक्षाबंधनाच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांना लाल रंगाची राखी बांधावी. त्यामुळे भावाच्या व्यवसायात वाढ होण्यास मदत होणार आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांनी रक्षाबंधनाच्या दिवशी पिवळ्या किंवा केशरी रंगाची राखी बांधावी. यामुळे भावा-बहिणीमध्ये कटुता राहणार नाही.
मकर राशीच्या लोकांनी रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला निळ्या रंगाची राखी बांधावी. त्यामुळे अनेक समस्यांपासून होईल सुटका.
रक्षाबंधनाच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांना निळ्या किंवा गडद निळ्या रंगाची राखी बांधावी. या रंगांची राखी बांधणे खूप शुभ मानले जाते.
रक्षाबंधनाच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची राखी बांधावी. या रंगांची राखी बांधल्याने भाऊ-बहिणींमधील प्रेम वाढते, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)