फोटो सौजन्य- pinterest
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी चंद्र देव आणि शुक्र देव नक्षत्रात संक्रमण करणार आहे. त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीचे दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. यावेळी प्रभावशाली ग्रह, राशी आणि त्यांच्या नक्षत्रामध्ये ते संक्रमण करतील. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी चंद्र देव आणि शुक्र यांचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या हे दोन्ही ग्रह शुभ मानले जातात. पंचांगानुसार, शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी पहाटे 12.41 वाजता चंद्र ग्रह स्वाती नक्षत्रात संक्रमण करणार आहे तर 3.51 वाजता शुक्र ग्रह आर्द्रा नक्षत्रात संक्रमण करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, २७ नक्षत्रांपैकी आर्द्रा नक्षत्र हे सहाव्या स्थानावर आहे तर स्वाती नक्षत्र 15 व्या स्थानावर आहे. शुक्र ग्रह हा धन, समृद्धी, विलासी जीवन आणि आनंद देणारा ग्रह असल्याचे मानले जाते. चंद्र देवाला मन, माता, मानसिक स्थिती, पाणी, निसर्ग, वाणी आणि विचारांचे कारक मानले जाते. चंद्र आणि शुक्र यांच्या संक्रमणामुळे ऑगस्टच्या सुरुवातीलाच कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
ऑगस्ट महिन्याचा सुरुवातीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आनंदाचा राहणार आहे. यावेळी तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. व्यावसायिकांचा दिवस चांगला राहील. व्यवसायानिमित्त तुम्हाला बाहेर जावे लागू शकते.
ऑगस्ट महिन्याचा सुरुवातीचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. या काळामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले व्यवहार पूर्ण होतील. जे लोक नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल आहे. अविवाहित व्यक्ती त्यांच्या भावंडांसोबत वेळ घालवण्यास आनंदी राहतील.
मेष आणि तूळ राशींसोबतच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीचा काळ फायदेशीर राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. त्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील. व्यापारी आणि दुकानदारांना मानसिक शांती मिळेल. तसेच या काळात आर्थिक स्थितीसुद्धा स्थिर राहील. धार्मिक गोष्टीकडे आवड निर्माण होईल. त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






