• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Why Does Bappa Have 21 Durvachas What Is The Spiritual Reason

बाप्पाला २१ दुर्वाच का वाहतात? दुर्वा अर्पण करण्याचे आध्यात्मिक रहस्य काय

काही दिवसांवर गणेशोत्सव आलेला आहे. आपण गणपतीची पूजा करण्यासाठी दुर्वाचा वापर करतो. बाप्पाला या दुर्वा अर्पण करताना २१ जोड्या वापरल्या जातात. यामागील काय आहे आध्यात्मिक रहस्य ते जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 31, 2025 | 01:45 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उद्यापासून ऑगस्ट महिन्याची सुरुवात होत आहे. यावेळी मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर 26 ऑगस्टपासून भाद्रपद महिना देखील सुरु होत आहे. त्यावेळी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. गणपती बाप्पाचे आपण कोणतेही व्रत करताना त्यामध्ये २१ दुर्वाचा समावेश केलेला असतो. २१ दुर्वांना वेगवेगळा अर्थ आहे. या दुर्वा अर्पण करणे हे अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली उपासना असल्याचे मानले जाते. हे फक्त एक पारंपरिक कर्मकांड नसून, यामागे गहन आध्यात्मिक अर्थ, सूक्ष्मदेह शुद्धीकरण, आणि मनशुद्धीचा एक वैज्ञानिक मार्ग देखील आहे. गणपती बाप्पाला २१ दुर्वा अर्पण करण्यामागे काय आहे आध्यात्मिक रहस्य, जाणून घेऊया

दुर्वा म्हणजे काय?

‘दुर्वा’या शब्दाचा अर्थ असा होतो की, “दु:खं व्रजति इति दुर्वा” – जे दुःख दूर करते ती दुर्वा. म्हणजेच ती तृण असूनही अनंत शक्तीची वाहक आहे. ती ज्या प्रकारे कितीही कापली तरी पुन्हा पुन्हा उगम पावते, ती अनंतचेतनेचं प्रतीक आहे — पुनर्जन्म, पुनरुत्थान, व अजेयता दर्शवते.

गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत?

मान्यतेनुसार, दुर्वा ही पृथ्वी तत्वाचे प्रतीक मानले जाते. गणपतीसुद्धा मूलाधारचक्राचा अधिपती असल्यामुळे, दुर्वा आणि गणेश यांचा संबंध मूल प्रकृतीशी  निगडित आहे. अशी देखील मान्यता आहे की, अनलासुर नावाचा राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्ग दोन्हीमध्ये दहशत निर्माण केली होती. अनलासुराच्या दहशतीमुळे भयभीत झालेले ऋषी आणि देवसुद्धा भगवान शंकराकडे आले आणि त्यांनी आपली दुर्दशा सांगितली आणि अनलासुरपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली.

Guruwar Upay: गुरुवारी तुळशीचे ‘हे’ उपाय केल्याने तुमच्या घरात येईल सुख समृद्धी

त्यावेळी महादेवांनी असे म्हटले होते की, अनलासुराचा वध फक्त श्री गणेशच करू शकतो. नंतर तेच झाले आणि श्री गणेशाने अनलासुरला गिळले. असे केल्याने श्री गणेशाच्या पोटात तीव्र जळजळ होऊ लागली. त्याच्या पोटातील जळजळ कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. पण दिलासा मिळाला नाही. त्यानंतर ऋषी कश्यप यांनी दुर्वाच्या २१ गुंठ्या बनवून श्री गणेशाला खाऊ घातल्या आणि दुर्वा प्राशन करताच त्यांच्या पोटातील जळजळ कमी झाली. तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा प्रिय असल्याचे म्हटले जाते. तसेच गणपतीच्या पूजेमध्ये देखील नेहमी दुर्वांचा समावेश केला जातो.

२१ दुर्वांचे आध्यात्मिक अर्थ

1. एकाग्रता – मन एकवट करण्याची सुरुवात

2 द्वैत निवृत्ती – मी-ते, सुख-दुःख यापलीकडे जाणे

3 त्रिगुण शमन – सत्त्व, रज, तम यांवर संयम

4 चतुर्वेद पूजन – ज्ञानप्राप्तीची दिशा

5 पंचतत्त्व साक्षात्कार – पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचे संतुलन

6 षड्चक्र जागृती – मूलाधार ते आज्ञा चक्रापर्यंतची ऊर्जा प्रवाह निर्मिती

7 सप्तधातू शुद्धी – शरीरातील सात धातूंची निर्मळता

8 अष्टदिशा रक्षण – संपूर्ण जीवनात रक्षणभाव

9नवग्रह शांतता – ग्रहदोष निवारण

10 दशदिक्बंधन निर्मूलन – दहा दिशांमधील निगेटिव्ह ऊर्जा शमवणे

11 एकादश रुद्र तत्त्व प्रबोधन – रुद्रतेज जागवणे

12 द्वादश आदित्य तेज जागरण

13 त्रयोदशी – मृत्युतत्त्वावर विजय

14 चतुर्दशी – मनातील भयावर मात

15 पूर्णिमा – समृद्धी आणि शांतीची प्राप्ती

16 सोडस संस्कार जागृती – जीवनातील महत्त्वाचे संस्कार जागृत करणे

17 सप्तर्षि स्मरण – ऋषिमार्गाची स्मृती

18 अष्टसिद्धींची प्राप्ती

19 नवविधा भक्तीचा अभ्यास

20 विश्वरूप दर्शनाची पात्रता

21 पूर्ण आत्मसमर्पण – त्वमेव सर्वं भावसंपन्न पूर्ती

ज्यावेळी आपण २१ दुर्वा अर्पण करतो त्यावेळी जप, ध्यान किंवा मंत्रोच्चार करतो त्यामुळे व्यक्तीच्या ऊर्जा केंद्रांवर सकारात्मक प्रभाव पडतो. विशेषतः हे उपाय मूलाधार ते सहस्रार चक्र शुद्ध करतात.

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी या राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य, प्रलंबित कामे होतील पूर्ण

दुर्वा अर्पण करताना या मंत्रांचा जप करा

ॐ गं गणपतये नमः दुर्वांकुरान् समर्पयामि।

दुर्वा अर्पण करताना या मंत्रांचा जप केल्याने ती जणू अंतर्यामाला वाहिलेली श्रद्धा ठरते. दुर्वा फक्त तृण नाही, ती भक्तीचा मूलतत्त्व मंत्र आहे. २१ दुर्वा म्हणजे २१ भावस्थिती, २१ शरीरातील केंद्रांची शुद्धी आणि २१ पायऱ्यांची आत्मोन्नती. ज्यावेळी श्रद्धा, मंत्र आणि ध्यान यांची त्रिसूत्री या 21 दुर्वांमध्ये एकत्र येते त्यावेळी साधकाला श्रीगणेशाचा ‘सिद्धिदाता’ रूपात साक्षात्कार होतो.

त्यासोबतच २१ दुर्वा म्हणजे ईश्वराला अर्पण केलेल्या २१ मौन प्रार्थना, असे म्हटले जाते आणि श्रीगणेश त्या सर्व प्रार्थनांचा एकाच प्रसादाने उत्तर देतो ते म्हणजे“विघ्न नाही, विजयी हो.”

(टीप – हा लेख ॲड. विकास एस. भाले (आध्यात्मिक लेखक व साधक) यांनी लिहिला असून आम्ही माहितीसाठी देत आहोत.)

Web Title: Why does bappa have 21 durvachas what is the spiritual reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांची होणार चांदीच चांदी
1

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांची होणार चांदीच चांदी

Sankashti Chaturthi: कधी आहे 6 की 7 अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
2

Sankashti Chaturthi: कधी आहे 6 की 7 अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Shukrawar Upay: वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय, दूर होईल पैशांची चिंता
3

Shukrawar Upay: वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय, दूर होईल पैशांची चिंता

Lucky Gemstones: या रत्नांनी चमकू शकते नशीब, मिळेल यश आणि समृद्धी
4

Lucky Gemstones: या रत्नांनी चमकू शकते नशीब, मिळेल यश आणि समृद्धी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kim Jong Un: किम जोंग उन यांचा दणका! 1.5 लाख लोक आणि त्यांची उत्तराधिकारी, पाहा ‘ब्लॅक’ फॅमिलीचा तोरा

Kim Jong Un: किम जोंग उन यांचा दणका! 1.5 लाख लोक आणि त्यांची उत्तराधिकारी, पाहा ‘ब्लॅक’ फॅमिलीचा तोरा

Jan 02, 2026 | 01:18 PM
तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी

Jan 02, 2026 | 01:08 PM
Ikkis Box Office: 200 कोटींचा ‘इक्कीस’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? धर्मेंद्र यांच्या अखेरच्या चित्रपटाची पहिल्या दिवशी एवढीच कमाई

Ikkis Box Office: 200 कोटींचा ‘इक्कीस’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? धर्मेंद्र यांच्या अखेरच्या चित्रपटाची पहिल्या दिवशी एवढीच कमाई

Jan 02, 2026 | 01:06 PM
Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Jan 02, 2026 | 12:58 PM
व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Jan 02, 2026 | 12:49 PM
Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

Jan 02, 2026 | 12:48 PM
Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Jan 02, 2026 | 12:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.