फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीनुसार विशेष योग तयार होतात. या योगामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठे बदल होताना दिसून येतात. शुभ योगांपैकी हंस महापुरुष राजयोग होय. हा राजयोग देवांचा गुरु बृहस्पतिमुळे तयार होतो. याचा परिणाम व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावरच होत नाही तर समाज, देश आणि जगाच्या पातळीवरही जाणवू शकतो.
हा शुभ योग 12 वर्षांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये तयार होणार आहे. त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांना अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना आरोग्य, संपत्ती, करिअर आणि व्यवसाय यामध्ये यश मिळण्यास मदत होते. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रामध्ये हंस महापुरुष योग हा पंच महापुरुष योगांपैकी सर्वात शुभ आणि शक्तिशाली योगांपैकी एक मानला जातो. ज्यावेळी गुरु ग्रह व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मध्यभागी असतो त्यावेळी हा योग तयार होतो. ज्या राशींमध्ये बृहस्पति सर्वात मजबूत आहे अशा व्यक्तींना हा समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
ज्यावेळी दोन्ही अटी एकत्रितपणे पूर्ण होतात त्यावेळी कुंडलीमध्ये हंस महापुरुष राजयोग तयार होतो. व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा योग असतो त्या व्यक्तीचा स्वभाव बुद्धिमान, आदरणीय आणि धार्मिक स्वभावाचा असतो. अशा व्यक्तींना समाजात विशेष आदर आणि सन्मान मिळतो. तसेच व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासातही महत्त्वाची भूमिका बजावतो.
हंस महापुरुष राजयोग मिथुन राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरु शकतो. ज्यावेळी गुरु ग्रह दुसऱ्या कुंडलीमध्ये असतो त्यावेळी धन, वाणी आणि कौटुंबिक सुखाशी संबंधित गोष्टी समजते. यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहून कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते. ज्यावेळी कुंडलीमध्ये गुरु ग्रह दहाव्या आणि सातव्या घरात असतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनात गोडवा राहतो. हा काळ या व्यक्तीच्या करिअर आणि नोकरीसाठी अनुकूल असतो.
हंस महापुरुष राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानला जातो. या लोकांनी कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असल्यास त्याचा फायदा होतो. तर उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता वाढते. जे लोक व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहारात गुंतलेले आहेत अशा लोकांना या काळामध्ये चांगला नफा मिळतो. तसेच तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र हा काळ व्यापारी आणि दुकानदारांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या लोकांना वैयक्तिक जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील.
हंस महापुरुष राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. गुरु तुमच्या भाग्य घरात असल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. धार्मिक, आध्यात्मिक किंवा कौटुंबिक कार्यातील तुम्ही मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ शकतात. एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)