फोटो सौजन्य- istock
रविवार 19 जानेवारी ज्योतिषशास्त्रानुसार मेष, सिंह आणि तूळ राशीसह इतर काही राशींसाठी शुभ असेल. आज चंद्र ग्रह बुधमध्ये संचार करेल. चंद्राच्या संक्रमणामुळे आज चंद्रमाचे गुरु आणि सूर्यासोबत त्रिकोण योग तयार होत आहे. अशा स्थितीत आजचा रविवारचा दिवस मेष ते मीनपर्यंतच्या राशीसाठी कसा असेल ते जाणून घेऊया.
आजचा रविवारचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही तुमची काम पूर्ण करून मित्रांसोबत बाहेर जाऊ शकतात. एखादी हरवलेली वस्तू परत मिळण्याचा आनंद होईल. आज तुम्ही थोडे हुशारही व्हाल जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आनंद घेता येईल. तुमचे परस्पर प्रेम आणि सहकार्य तुमच्या वैवाहिक जीवनात कायम राहील.
आज वृषभ राशीच्या लोकांसाठी आपल्या कामासाठी विशेष राहतील. गुंतवणूक विचारपूर्वक करा. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता. आज तुम्ही तुमच्या मुलांसोबत मजा करू शकता.
सूर्यास्तानंतर फुले आणि पाने का तोडली जात नाहीत? काय आहे यामागील धार्मिक कारण
मिथुन राशीच्या लोकांना घरातील मोठ्यांचे सहकार्य लाभेल. आज तुमच्या घरातील शुभ कार्य होतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शॉपिंगला जाऊ शकतात. संगीत आणि कला क्षेत्रात तुम्हाला आवड निर्माण होईल. व्यवसायात लोकांना फायदा होईल. आज तुम्हाला कोणत्याही राजकीय व्यक्तीकडून फायदा होऊ शकेल. परंतु भागीदारीत कोणतेही काम केल्यास भागीदारांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या परिवारासोबत धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. तुमची कामे पूर्ण होतील पण ती व्यवस्थितरीत्या पूर्ण करा. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
सिंह राशीच्या लोकांना पारिवारिक जीवनात सुख लाभेल. जोडीदाराच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल. जमिनीच्या संबंधित व्यवहार असतील तर ते सामंजस्याने पूर्ण होतील.
या राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार, शुक्र शनि देणार यश आणि संपत्ती
कन्या राशीच्या लोकांनी मित्रांसोबत व्यवस्थित वागा. कारण काही कारणांनी तुमचे मतभेद होऊ शकतात. दुसर्याच्या गोष्टीत लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामात लक्ष द्या त्याने तुम्हाला फायदा होईल. तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस सूर्यदेवाच्या कृपेने लाभदायक राहील. आज व्यापार मध्ये प्रगती करून मन आनंदित होईल. परंतु तुम्ही स्वतः वर विश्वास ठेवावा लोकांच्या बोलण्यात येऊन कोणतेही निर्णय घेऊ नये. तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. भावडांसोबत आपला वेळ घालवा. तुमचा नवीन लोकांशी ओळख होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही परिवारासोबत धार्मिक ठिकाणी जायची व्यवस्था बघावी.
धनु राशीच्या लोकांना आज लाभ होईल. मोठ्या भावाचे सहकार्य लाभेल. हॉटेल आणि टुरट्रॅव्हलचे काम करणारे लोकांची प्रगती होईल. तुमचा खर्च वाढला असेल तर तो कंट्रोलमध्ये येईल.
मकर राशीची लोक आपले अपूर्ण काम पूर्ण होतील. तुमचे विरोधक तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. तुम्ही कोणताही व्यवहार करणार असाल तर सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
आज तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळेल. अधिकारी लोकांचे सहकार्य मिळेल. तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त असाल. धार्मिक ठिकाणी जाऊ शकता.
आज तुम्हाला काही गोष्टींमध्ये लाभ होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर परत मिळतील.
(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)