उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो- यूट्यूब)
शिवाजी पार्कमध्ये पार पडली महायुतीची सभा
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी फडणवीस, शिदेंची सभा
ठाकरे बंधूंच्या आरोपाना दिले प्रत्युत्तर
Maharashtra Politics: राज्यात 15 तारखेला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. भाजप-शिवसेना युती विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढत होणार आहे. काल शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधू यांनी सभा घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह युतीवर टीका केली होती. त्यावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खऱ्या अर्थाने आजची सभा ही परिवर्तनाची नांदी आहे. काल इथे एक सभा झाली. त्यात शिव्या, टोमणे बोलून गेले. त्याची आम्हाला सवय झाली. मुद्देच नाहीततर बोलणार काय? आपली ही आजची सभा उत्तर सभा नसून, गेल्या साडे तीन वर्षात मुंबईत केलेल्या कामांचा लेखाजोखा तसेच पुढील पाच वर्षात काय करणार हे सांगणार आहोत.”
ठमी कधीही आरोपांना आरोपांने उत्तर दिले नाही. या ठिकाणी भावनेचे नाही विकासाचे राजकारण अपेक्षित आहे. विकसित भारत, विकसित मुंबई आणि विकसित महाराष्ट्र हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. मुंबई राज्याचा मानबिंदू आहे. निवडणूक आली की काही लोकांना मराठी माणसाची आठवण येते. एरवी कधी मराठी माणसांकडे लक्षही देत नाहीत. दिवसभर नेटफ्लिक्स अन् वेळ मिळाला तर पॉलिटिक्स..एवढंच त्यांचा इंटरेस्ट आहे. पांच साल घर मै, चुनाव आया तो मुंबई खतरे मै. मुंबईच्या आजच्या अवस्थेला हेच लोक जबाबदार आहेत. ”
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल आणि मराठीच होईल.तुम्ही मराठी माणसासाठी काय केले? मुंबईत मराठीच महापौर होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. पागडीमुक्त मुंबई करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार. आम्ही केलेली कामे आधी पहावी आणि मग विरोधकांनी यांच्यावर बोलावे. 10 ते 12 हजार गिरणी कामगार यांना महायुती सरकारने घरे दिली. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. त्यांच्या काळात केलेले एक तरी काम सांगा. महाविकास आघाडी सरकार आल्यावर सगळी विकासकामे रोखली. आमचे सरकार आल्यावर सगळी विकासकामे सुरू झाले. या लोकांनी कामे अडवून धरल्याने दहा हजार कोटींनी वाढला. तुमच्या आडमुठ्या धोरणामुळे मुंबईकरांचे हाल झाले. ही लोक विकासविरोधी आहेत.”






