शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; 'पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे (photo Credit- X)
ठाण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, आज घराघरात ५ हजार रुपये वाटले जात आहेत. मला पैसे देणाऱ्यांची चिंता नाही, तर पैसे घेणाऱ्यांची चिंता वाटतेय. भाजपने मतदारांना गृहीत धरले आहे. तसेच, राजकारणातील फोडाफोडीवर निशाणा साधताना राज ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला. तसेच, कोणाला ५ कोटी, कोणाला १० कोटी तर कोणाला १५ कोटींची ऑफर दिली जात आहे. सोलापुरात तर आमच्या माणसाला मारले गेले, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर हल्ला चढवला.
Maharashtra Politics: “हिंमत असल्यास हात-पाय तोडून…”; के. अण्णामलई यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
राज ठाकरे यांच्यावर अदानींशी मैत्री असल्याचा आरोप करत काही जुने फोटो व्हायरल करण्यात आले होते. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “काल मी अदानींचे प्रकरण काढले तर काही लोकांना मिरच्या झोंबल्या. ते माझे दोन-चार वर्षांपूर्वीचे फोटो दाखवत आहेत. माझ्या घरी अदानी आले, रतन टाटा आले, अंबानीही आले. पण घरी आले म्हणून मी त्यांची पापं झाकायची का?”
राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीगत भेटीगाठी आणि सार्वजनिक हित यात मोठी तफावत आहे. “घरी आल्यावर कोणाला हाकलून थोडेच देणार? पण जेव्हा महाराष्ट्रावर, मुंबईवर किंवा ठाण्यावर संकट येईल, तेव्हा राज ठाकरे दोस्ती-बिस्ती बघणार नाही. अदानीशी दोस्ती करण्याचा तर विषयच नाही, मी इतका ‘अडाणी’ नाही,” असा टोला त्यांनी लगावला.






