विशालच्या टोमण्याने प्रभू दुखावला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पहिल्याच दिवशी ‘डॉन’ म्हणून ओळख असणारा प्रभू शेळके हा चक्क रडला आहे. त्याला कारणीभूत ठरलाय तो प्रसिद्ध अभिनेता विशाल कोटियन. विशाल आपल्या मस्करी आणि जॉली स्वभावासाठी खरंतर ओळखला जातो. इथेही विशाल तसाच वावरतोय. नक्की काय घडले जाणून घ्या.
पहा प्रोमो
विशालचे बोलणे प्रभूला लागले
घरात प्रवेश केल्यानंतर काही तासातच ही घटना घडली असल्याचे वाटत आहे. खरंतर विशाल कोटियन हा अत्यंत जॉली स्वभावाचा आहे आणि प्रभू काहीतरी बोलत असताना त्याने पटकन प्रभूला उचलून कॅमेऱ्यासमोर धरत त्याची मदतच केली होती. त्यावर प्रभू त्याला पटकन म्हणाला की, ‘मी काही डंबेल्स नाही माझ्यासोबत अशी मस्करी पुन्हा करू नकोस’, त्यावर त्वरीत प्रतिक्रिया देत विशाल त्याला म्हणाला, ‘तू डॉन असशील रे पण फक्त नावाने…’ ही गोष्ट प्रभूच्या मनाला फारच लागली आणि त्याच्या डोळ्यातून चक्क घळाघळा पाणी वाहू लागले.
नेटिझन्सने केली सूरजशी तुलना
या प्रोमोवर नेटिझन्सने प्रभूची तुलना चक्क मागच्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणशी केली आहे. इतकंच नाही तर अनेकांनी म्हटलं आहे की, यावेळी सिंपथी देऊन कोणाला विजेता करू नका, तर दुसरा म्हणाला की, ‘राकेशने हे केले तेव्हा तर हसत होता…विशालने गंमत केली तर रडायला लागला’, तर एकाने कमेंट केली, ‘सूरज चव्हाणचा लहान भाऊ’, तर काहींनी प्रभूची बाजूही घेतली आहे आणि म्हणाले की, ‘तू चांगला खेळ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत’. आता हा खेळ दिवसेंदिवस रंगणार आहे आणि अगदी पहिल्याच दिवशी जर ही अवस्था असेल तर पुढे बिग बॉसमध्ये 100 दिवसात काय घडणार हेदेखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






