फोटो सौजन्य- pinterest
दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येतो. हा दिवस केवळ भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे स्मरण करण्याचा दिवस नसून त्यांच्या दिव्य स्वरूपाचे आणि चमत्कारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. यंदा जन्माष्टमी शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी आहे. असे मानले जाते की, ज्यावेळी पृथ्वीवर अधर्म वाढला तेव्हा भगवान विष्णूने श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला आणि त्याचा अंत केला. बाळ गोपाळांच्या कृत्ये असोत किंवा महाभारतात त्यांनी दिलेले ज्ञान असो, श्रीकृष्णाचे प्रत्येक रूप माणसाला मार्ग दाखवते. जन्माष्टमीच्या काही उपाय आणि मंत्रांचा जप केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. कोणत्या मंत्रांचा जप करावा, जाणून घ्या
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे॥
या मंत्राला ‘महामंत्र’ असे म्हटले जाते. कारण या मंत्रांचा जप संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक केला जातो. जर हा मंत्र आपण पूर्ण भक्तीने जपला गेला तर मानसिक ताण, भीती, चिंता आणि अपयश दूर होऊ लागतात. तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये शांती आणि सकारात्मकता येते.
हा 12 अक्षरांचा मंत्र खूप प्रभावी मानला जातो. मान्यतेनुसार, या मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद, सौभाग्य आणि यश वाढते. तसेच प्रेमविवाह आणि नातेसंबंधांमध्ये समस्या असलेल्यांसाठी हा मंत्र खूप फायदेशीर ठरतो. या मंत्र्यांचा नियमितपणे जप केल्याने नात्यात गोडवा राहील आणि मनाला शांती मिळेल.
कृं कृष्णाय नमः हा एक बीजमंत्र आहे ज्याला शक्तीचे केंद्र मानले जाते. हा मंत्र स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितला होता, असे म्हटले जाते. तसेच या मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तसेच घरामध्ये शांती आणि आनंदाचे वातावरण राहते. या मंत्रांचा सकाळी लवकर उठून 108 वेळा जप करावा.
ओम श्री कृष्णाय शरणम मम हा मंत्र पूर्ण शरणागतीची भावना जागृत करतो. असे म्हटले जाते की, ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःला देवाला समर्पित करते, तेव्हा देव त्याला कधीही सोडत नाही. तसेच जो व्यक्ती संकटांत असेल त्या व्यक्तीने या मंत्रांचा जप करावा. या मंत्रांमुळे भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीचा सन्मान वाचवला होता. तो आत्मविश्वास आणि धैर्य दोन्ही देतो.
आदौ देवकी देव गर्भजननं, गोपी गृहे वर्धनम्।
माया पूजनिकासु ताप हरणं गोवर्धनोधरणम्।।
कंसच्छेदनं कौरवादिहननं, कुंतीसुपाजालनम्।
एतद् श्रीमद्भागवतम् पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम्।।”
श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रमुख लीलांचे प्रमुख वर्णन या मंत्रामध्ये करण्यात आलेला आहे. या मंत्रांमुळे मनाला शांती मिळत नाही तर भक्ताला आठवण करुन दिली जाते की, तुमच्या जीवनात कितीही संकटे आली तरी देव प्रत्येक पावलावर त्याच्यासोबत असतो.
अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णं दामोदरं वासुदेवं हरे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
जानकी नायकं रामचंद्रं भजे।।”
या मंत्रांच्या रुपामध्ये देवाच्या अनेक रूपांचे एकत्र स्मरण केले जाते. तसेच मनातील भक्ती आणि समर्पणाची भावना वाढते. या मंत्रांचा दररोज सकाळी लवकर उठून जप करावा. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. त्यामुळे सर्व त्रास दूर होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)