फोटो सौजन्य- pinterest
गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस चंद्राने धनु राशीत राहून उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश केला आहे. यावेळी चंद्र मकर राशीमध्ये उपस्थित आहे. नक्षत्र संक्रमणानंतर रात्री 8.10 वाजता चंद्राने मकर राशीमध्ये प्रवेश केला जिथे तो रविवार 10 ऑगस्ट रोजी पहाटे 2.10 पर्यंत राहील. तर चंद्र 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.27 पर्यंत उत्तराषाढा नक्षत्रात राहणार आहे. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. तर या काळामध्ये काही लोकांचे बिघडलेले संबंध सुधारतील. तसेच या काळात तुम्हाला आर्थिक लाभामुळे मानसिक शांती मिळू शकते. चंद्राच्या नक्षत्र बदलाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांना चंद्राच्या संक्रमणाचा फायदा होणार आहे. त्यामुळे या लोकांचे भाग्य बलवान होईल. या काळामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेत पूर्वीपेक्षा चांगले गुण मिळतील त्यामुळे पालकांना खूप आनंद होईल. तर व्यावसायिकांना परदेशी संपर्कांचा फायदा होईल. व्यवसायामध्ये विस्तार होईल. नोकरी करणाऱ्यांच्या प्रयत्नांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तसेच उत्पन्नामध्ये वाढ देखील होऊ शकते. तसेच तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात. तुमची एखाद्या जुन्या लोकांची ओळख होईल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
कर्क राशीच्या लोकांवर चंद्र देवाची कृपा राहणार आहे. बेरोजगार लोकांच्या कष्टाचे फळ मिळेल आणि त्यांना नवीन नोकरी मिळेल. त्यासोबतच अविवाहित लोक मित्रांसोबत वेळ घालवतील. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्या लोकांना अपेक्षित लाभ होऊ शकतो. या लोकांची आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना विविध संधी मिळतील. अविवाहित लोक मित्रांसोबत वेळ घालवू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाऊ शकते. तसेच तुमची प्रशंसा देखील होऊ शकते.
मेष आणि कर्क राशींव्यतिरिक्त चंद्राच्या नक्षत्र संक्रमणाचा फायदा मकर राशीच्या लोकांना होऊ शकतो. धार्मिक कार्यात रस वाढल्यामुळे वृद्धांना मानसिक शांती मिळेल तसेच या लोकांचे आरोग्य देखील सुधारते. याशिवाय कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कोणत्याही छोट्या योजनेत गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)