EKADASHI(फोटो सौजन्य- PINTEREST)
हिंदू पंचांग नुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कामदा एकादशीचा उपवास केला जातो. कामदा एकादशीला ‘चैत्र शुक्ल एकादशी’ असेही म्हंटले जाते, कारण हे चैत्र नवरात्रीच्या नंतर येते.
७ एप्रिल म्हणजेच आज कामदा एकादशीचा उपवास ठेवला जातो. हिंदू धर्मात अनेक त्योहार साजरे केले जातात. यात सगळ्यात विशेष असते ते म्हणजे एकादशी. एकादशीच्या पवित्र दिवशी आपण भगवान विष्णूची पूजा करतो आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी लोक उपवास ठेवतात आणि त्यांची पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कामदा एकादशीचे उपवास केले जाते. कामदा एकादशीला ‘चैत्र शुक्ल एकादशी’ असेही म्हंटले जाते, कारण हे चैत्र नवरात्रीच्या नंतर येते.
कामदा एकादशी 2025 शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील एकादशी तिथी ७ एप्रिल रोजी म्हणजे काल रात्री ८ वाजता सुरू झाली आहे आणि ही तिथी ८ एप्रिल रोजी म्हणजे उद्या रात्री ९.१२ वाजता संपेल. कामदा एकादशीचे पारण ९ एप्रिल रोजी सकाळी ६.०२ ते ८.३४ पर्यंत असेल.
कामदा एकादशी पूजेची विधी
एकादशीचा उपवास करण्यापूर्वी जेवणानंतर भगवान विष्णूचे स्मरण करावे आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास करण्याचा संकल्प करावा आणि देवाची प्रार्थना करावी. या दिवशी भगवान विष्णूला फुले, फळे, दूध, पंचामृत, तीळ इत्यादी अर्पण करावेत. देवाची पूजा केल्यानंतर दिवसभर देवाचे नाव जपावे आणि रात्री जागरण करावे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हे उपवास सोडले जाते.
कामदा एकादशीला उपवास करताना दिवसातून फक्त एकदाच जेवावे ज्यामध्ये दूध, फळे, भाज्या आणि सुक्या मेव्यापासून बनवलेले अन्न असावे. या दिवशी फक्त सात्विक आणि शाकाहारी अन्नच सेवन करावे. तसेच, तांदूळ, मूग डाळ, गहू आणि बार्ली खाऊ नये. सूर्यास्तापूर्वी अन्न ग्रहण करावे परंतु एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला दक्षिणा आणि भोजन देऊनच अन्न ग्रहण करावे.
कामदा एकादशी उपाय
१. जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील, तर तुम्ही कामदा एकादशीला भगवान विष्णूचा बीज मंत्र जपला पाहिजे आणि तो मंत्र आहे- ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’.
२. जर तुमच्या कारकिर्दीत समस्या येत असतील तर एकादशीला भगवान विष्णूला ११ पिवळी फुले अर्पण करा. या दिवशी विष्णू चालीसा पाठ करणे देखील फायदेशीर आहे.