फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्राच्या अंदाजाप्रमाणे मंगळ ग्रह 18 महिन्यानंतर आपली राशी बदलणार आहे. या बदलाचा परिणाम विविध राशींवर होताना दिसून येणार आहे. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानला जात असल्याने त्याच्या राशी बदलाचा या राशींवर तसेच इतर राशींवर खोलवर परिणाम होतो. सध्या मंगळ सिंह राशीत संक्रमण करत आहे तर केतुसोबत युती करत आहे, ज्यामुळे अनेक राशींमध्ये गोंधळ आणि तणावाची शक्यता निर्माण होत आहे. सोमवार, 28 जुलै रोजी मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करत असल्याने काही लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. या बदलाचा परिणाम म्हणजे काही राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते.
या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती स्थिर होईल. सामाजिक आणि व्यावसायिक स्थिती सुधारेल. याशिवाय कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. एखाद्याचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कन्या राशीमध्ये मंगळाने प्रवास केल्याने या राशीच्या जीवनात यशाचे नवीन मार्ग सापडतील. तसेच विविध क्षेत्रांमध्ये प्रगती होईल. मंगळ ग्रहाचा कन्या राशीत प्रवेशामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या
सिंह राशीच्या लोकांना मंगळाचे हे संक्रमण फायदेशीर ठरेल. मंगळ दुसऱ्या राशीत प्रवेश करत असल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच या लोकांना नशिबाची साथ मिळेल. त्याचसोबत तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्ही कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करु शकता. तुम्हाला तुमच्या घरच्यांचा पाठिंबा मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांना मंगळाचे हे संक्रमण चांगले राहील. तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ उत्पन्न आणि लाभाच्या स्थानावर असल्याने तुमच्या उत्पन्नात नवीन स्त्रोत निर्माण होऊन त्यात वाढ होऊ शकते. जर एखादी नवीन कामाची सुरुवात करणार असेल किंवा स्वतःचे ध्येय साध्य करायचे असल्यास हा काळ खूप अनुकूल आहे. जे लोक कला, लेखन किंवा इतर क्षेत्रात कार्यरत आहे त्यांच्यासाठी हा काळ शुभ मानला जातो. तसेच वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळामध्ये प्रवाळ रत्न धारण करणे अधिक फायदेशीर ठरु शकते.
मकर राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अनुकूल राहील. कारण मंगळ ग्रह तुमच्या नवव्या घरात असल्याने तुमची प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. काही लोकांना काम आणि व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर जावे लागू शकते. तसेच हे लोक घरामध्ये धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाचे आयोजन देखील करु शकतात. तुम्ही ठरवलेली ध्येयसुद्धा पूर्ण होऊ शकतात. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठीही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)