फोटो सौजन्य- सोशल मीडिया
मार्गशीर्ष महिना सुरु आहे. संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्यात येत आहे. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. 5 डिसेंबरला सुरु झालेला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचे उद्यापन करण्यात येते. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करुन हळदीकुंकू करण्यात येते. यावेळी शेवटच्या गुरुवारी एकादशीचे व्रतदेखील आले आहे. एकादशीचे व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडले जाते. त्यामुळे गुरुवारचं व्रत आणि त्याच उद्यापन करावे की नाही याबद्दल महिलांमध्ये संभ्रम आहे.
मार्गशीर्ष गुरुवार आणि सफाळा एकादशी व्रत हे पूर्णपणे वेगळे व्रत आहे. या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ज्या लोकांचा एकादशीचं व्रत नाही त्यांनी मार्गशीर्ष गुरुवारी नेहमीप्रमाणे देवीची उपासना करून उद्यापन करावे आणि नैवेद्य दाखवावा.
प्रदोष व्रत संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी पूजा करुन फक्त तीर्थ घ्यावे आणि रात्री उपवासाचे पदार्थ खावे. ज्या महिलांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करुन उद्यापन करुन नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्याचे ताट गाईला द्यावे त्यानंतर एकादशीचा उपवास पुढे चालू ठेवावा.
शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केलाय. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आणि हळदीकुंकू करण्यात काहीही फरक नाही.
सफाळा एकादशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
जिथे पुजा मांडायची आहे तिथे गोमुत्र किंवा गंगाजल शिंपडून जागा स्वच्छ करावी. त्यानंतर रांगोळी काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा. आता मध्यभागी तांदूळ ठेवून कळश स्थापन करा. कळशात दुर्वा, पैसे आणि सुपारी घाला. आंब्याची पाच पान ठेवून त्यावर नारळ ठेवावा. या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता. अगदी कळशाला ब्लाऊज पीसने सजवा. आता लक्ष्मीला दागिन्यांनी शृंगार करा. कळशाला चारही बाजून हळदीकुंकू लावा. हा नारळ म्हणजे विष्णू भगवंत असतात.
त्यानंतर तुमच्याकडे लक्ष्मीमातेचा मुखवटा असेल तर तो तुम्ही मांडू शकता किंवा लक्ष्मीचा फोटो, यंत्र किंवा छोटी मूर्तीही तुम्ही ठेऊ शकता. तिला छान सजवून देवीपुढे पाच फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसंच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बाताशे, छोट्या पेल्यात दूध-साखर नक्की ठेवावे.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)