फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्षन्याला महत्त्वाचे स्थान आहे. या महिन्यात महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी हा महिना खूप प्रसिद्ध आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करणे खूप पुण्याचे मानले जाते. या दिवशी कलशाची स्थापना करुन पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येतेच. त्यासोबतच धनलाभ देखील होतो आणि वैवाहिक जीवनात देखील सुख समृद्धी राहते अशी श्रद्धा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे आणि पूजा कशी करावी ते जाणून घ्या
यावेळी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 21 नोव्हेंबरपासून झाली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी कलशाची स्थापना करुन पूजा झाल्यानंतर देवीला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
ज्या ठिकाणी कलश स्थापन करणार आहात ते ठिकाण स्वच्छ करुन झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वस्तिकाची रांगोळी काढावी.
त्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा.
चौरंगावर लाल रंगांचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ ठेवून कलश ठेवावा
कलशाला हळदीकुंकू लावून त्यामध्ये पाणी, तांदूळ, दुर्वा, एक नाणं आणि सुपारी ठेवावी.
विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपात्र कलशावर ठेवावे त्यानंतर त्यावर नारळ ठेवावा.
लाल कपड्यावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर कलशाची स्थापना करावी.
त्यानंतर देवीची मू्र्ती किंवा प्रतिमा ठेवावी.
कलशापुढे विडा, खोबरं, खारीक बदाम, इतर फळे, खडीसाखर, गूळ ठेवावा
त्यानंतर गुरुवारची व्रत कथा वाचावी आणि देवीला नैवेद्य दाखवावा.
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. असे म्हणतात की, या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सदैव लक्ष्मी – नारायणाचा आशीर्वाद मिळतो. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते.
मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे. श्रद्धेनुसार हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास देवीचे आशीर्वाद भक्तांवर राहतात. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या सुखी संसारासाठी, कुटुंबाची समृद्धी यावी, भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करतात अशी मान्यता आहे. प्रत्येक गुरुवारी पूजा मांडून हे व्रत केले जाते व शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. असे व्यवस्थित व्रत केले तर याचे शुभ फळ मिळते अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी आहे
Ans: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत पाळले जाते. या दिवशी कलश स्थापना केल्याने धन, संपत्ती आणि सुख समृद्धी वाढते
Ans: विडा, खोबरं, खारीक बदाम, इतर फळे, खडीसाखर, गूळ ठेवावा






