फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस चढ उताराचा राहू शकतो. आज अंक 4 असणाऱ्याचा स्वामी ग्रह राहू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर राहू ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या सोमवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असणाऱ्या लोकांना लाभ होऊ शकतो आणि मूलांक 4 असलेले लोक काही समस्यांचा सामना करू शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. काम लवकर करण्यासाठी प्रयत्न कराल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नये. कामाच्या ठिकाणी काही लोकांमुळे तुमच्यावर दबाव येऊ शकतो.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. अशा वेळी तुमच्यावर तणाव येऊ शकतो. विरोधकांपासून सावध रहा.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. तुमच्या कामामध्ये अडथळा येऊ शकतो. जोडीदारासोबत आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. स्वतः बद्दल विचार करा. फॅशनशी संबंधित असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. यावेळी कोणाला पैसे उधार देऊ नका.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यावरील मानसिक तणाव वाढू शकतो. विद्यार्थ्याचा आजचा दिवस व्यस्त राहील.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करू शकता. कुटुंबामध्ये सर्व लोकांचा पाठिंबा मिळेल
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






