फोटो सौजन्य- pinterest
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस विशेष राहील. अंक 4 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह राहू असेल. अशा वेळी राहूचा प्रभाव राहील. गुरुवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे गुरूचा अंक 3 असतो.
आज मूलांक 3 असलेले लोक कार्यरत राहतील. मूलांक 4 असलेल्या लोकांना घेतलेल्या मेहनतीचे अपेक्षित यश मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कोणत्याही बाबतीत जास्त राग करू नये अन्यथा समस्या येऊ शकतात . आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. त्यामुळे तुमची स्थिती चांगली राहील.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जास्त विचार करणे टाळा. त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन बदल बघायला मिळतील.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचे काम करू शकता. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात काही काम करण्यात तुम्ही जा व्यस्त राहाल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. खूप मेहनत घेत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. फिल्म आणि फॅशन क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना अनेक संधी मिळतील.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी त्यांच्या गोड बोलण्याने आणि वागण्याने परिस्थिती त्यांच्या बाजूने करतील. काळजीपूर्वक विचार करून काहीही बोलणे चांगले होईल. काळजीपूर्वक विचार करून काहीही बोलणे चांगले होईल.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. लोकांना त्यांच्या गोड बोलण्याने आणि वागण्याने कामाच्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. पण जास्त राग आणि कठोर शब्द वापरणे टाळा, अन्यथा विपरीत परिस्थिती उद्भवू शकते. कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबतीत आर्थिक फायदा होऊ शकतो.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसाय करणारे लोक आज व्यस्त राहतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम करताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा चुका होण्याची शक्यता आहे.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या बाबतीत काही लोकांकडून पाठिंबा मिळू शकतो. एखाद्याशी वाद होऊ शकतो. कोणताही निर्णय संयम आणि शांततेने घेणे चांगले राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवल्याने तुम्हाला बरे वाटेल.
मूलांक 9 असलेल्या लोकांनी कोणताही निर्णय घाईमध्ये घेऊ नये. तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकता, ज्यामुळे तुम्हाला थोडी शांती मिळेल. कोणत्याही कामात मोठे बदल करणे टाळा, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)