फोटो सौजन्य- pinterest
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनीचा प्रभाव राहील. आज सोमवार असल्याने त्याचा स्वामी स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांचा सन्मान वाढू शकतो आणि गुंतवणूक केल्याने लाभ होऊ शकतो. मूलांक 8 असलेल्या लोकांना व्यवसायात आणि गुंतवणुकीत अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाचा ठिकाणी सर्व कामे विचारपूर्वक करा. तुमच्या समजूतदारीची प्रशंसा होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक कराल त्यात तुम्हाला भविष्यात फायदा होईल. धार्मिक कार्यात तुम्हाला आवड निर्माण होईल आणि कुटुंबासोबत वेळ घालवाल.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात वाढ करण्यासाठी नवीन योजना आखू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. एखादी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यासोबत मतभेद होऊ शकतात.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाचा ठिकाणी सर्व कामे विचारपूर्वक पूर्ण कराल. व्यवसाय पुढे वाढवू शकता आणि कुटुंबात सकारात्मक बदल होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे आणि तुमचे पैसे कुठेतरी अडकून राहू शकतील त्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील आणि तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात नवीन ऑफर मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.
आज मूलांक 6 असणाऱ्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी विचार केलेली कामे पूर्ण न होण्याने तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या सकारात्मक विचाराने तुम्ही तुमची काम सोपी करू शकता. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची धावपळ होऊ शकते त्यामुळे तुम्ही अस्वस्थ रहाल. पायांशी संबंधित काही समस्यांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यवसायात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा वाद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला शांतता बाळगावी लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)