फोटो सौजन्य- pinterest
सप्टेंबरचा दुसरा आठवडा (8 ते 14 सप्टेंबर) सुरु होत आहे. या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीमुळे काही राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. तर काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगायची आवश्यकता आहे. या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. तसेच नवीन कामामध्ये तुमच्यामधील उत्साह वाढू शकतो. या आठवड्यात पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा कसा असेल, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आठवडा अनुकूल राहणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची नवीन ओळख होईल. आर्थिक व्यवहारात करताना खूप काळजी घ्यावी लागेल. गुंतवणूक करताना काळजी घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. जमीन आणि मालमत्तेचे व्यवहार काळजीपूर्वक करा. कामाच्या ठिकाणी लोकांशी समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. कोणतेही निर्णय घाईमध्ये घेणे टाळावे अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. या आठवड्यात तुमची प्रलंबित सर्व कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना खूप काळजीपूर्वक काम करावे लागेल. आरोग्य आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा प्रतिकूल राहील. तुम्ही या आठवड्यात मानसिक ताणतणाव आणि शारीरिकदृष्ट्या थकलेले राहू शकता.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहणार आहे. घरातील आणि बाहेरील लोकांची मदत आणि पाठिंबा मिळेल. तुमच्या वैयक्तिक प्रतिष्ठेबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. सुरुवातीला लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकतो. सामाजिक क्षेत्रात तुमच्या नवीन ओळखी होतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रतिकूल राहील. या आठवड्यामध्ये तुम्हाला आरोग्य आणि नातेसंबंधांच्या बाबतीत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. नातेवाईकांशी मतभेद तुमच्या समस्या वाढवू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. व्यवसायाशी संबंधित लोकांना कोणताही मोठा निर्णय घेण्यास तु्म्हाला अपेक्षित फायदा मिळेल. पैशाच्या आणि आर्थिक बाबींमध्ये समस्या येऊ शकतात.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुम्हाला महत्त्वाच्या कामांमध्ये संघर्ष करावा लागू शकतो. या आठवड्यात काही कामात अपेक्षित यश मिळाल्याने तुम्ही आनंदी असाल. नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी समन्वय राखावा लागेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यात तुम्हाला कामाशी संबंधित अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. सावधगिरीने काम केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबींमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा तुमच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश आणि लाभ मिळतील. तुम्हाला लहानसहान गोष्टींसाठी खूप धावपळ करावी लागेल आणि खूप संघर्ष करावा लागेल परंतु शेवटी तुम्हाला यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामात बदल किंवा बदली होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. तुम्हाला महत्त्वाच्या कामांमध्ये संघर्ष करावा लागू शकतो. जर न्यायालयात केस सुरू असेल तर तुम्हाला त्यासाठी जास्त धावपळ करावी लागू शकते. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी कराल. या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील. कोणत्याही योजनेबाबत निर्णय घेताना काळजी घ्या.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ उताराचा राहू शकतो. या आठवड्यात तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून तुलनेने कमी पाठिंबा मिळेल. तुमची कामाची पद्धत बदलण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवसायातील अडथळे कमी होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहणार आहे. या आठवड्याच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील, ज्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना वाढतील. तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. नोकरी करणाऱ्यांच्या पद आणि दर्जात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढण्याचे संकेत मिळतील. तुमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. व्यवसायात तुम्हाला फायदा होऊ शकतो.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. हा आठवडा तुमच्यासाठी बहुतांश सकारात्मक राहील. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या प्रयत्नांची आणि मेहनतीची प्रशंसा करतील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश आणि नफा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आधीच्या आठवड्यापेक्षा चांगला राहील. हंगामी आजार किंवा जुन्या आजाराच्या पुनरावृत्तीमुळे त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी मित्र आणि सहकाऱ्यांशी समन्वय राखण्याची आवश्यकता असेल. अडकलेल्या कामांना गती मिळेल. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या या आठवड्यात दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)