Numerology: या मूलांकांच्या लोकांची व्यवसायात होईल प्रगती, मिळेल अपेक्षित यश
आजचा शनिवारचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. आज शनिवार असल्याने आजचा दिवस शनिदेवाला समर्पित राहील. आज अनंत चतुर्दशी देखील आहे. आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाबरोबरच अनेक जणांकडे अनंताची पूजा देखील केली जाणार आहे. आज सर्व मूलांकांच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव दिसून येईल. आज शनिवार असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे शनिची संख्या 8 आहे. मूलांक 6 असलेल्या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. तर मूलांक 8 असलेल्या लोकांनी आर्थिक सावधगिरी बाळगावी. तसेच तुम्ही कुटुंबासोबत देखील वेळ घालवू शकता. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या.
मंगळसूत्र, जोडवी घालण्याची बंधनं स्त्रियांनाच का ? पुरुषांना का नाही ?
मूलांक 1
मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी चांगला राहील. तुमची सर्व कामे पूर्ण होतील आणि कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील. व्यवसायामध्ये प्रगतीसाठी तुम्हाला अनेक नवीन मार्ग सापडतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 2
मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. जर तुमचे पैसे बराच काळ कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. या काळात तुम्ही जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल.
मूलांक 3
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी त्यांच्या ज्ञानाचा आणि समजुतीचा फायदा होऊ शकतो. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना सरकारी नोकरीची नवीन ऑफर मिळू शकते. ज्याचा तु्म्हाला भविष्यात फायदा होईल. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमचे नातेसंबंध चांगले राहील.
मूलांक 4
मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस नेहमीपेक्षा कमी चांगला राहील. तुमचे येणारे पैसे अचानक कुठेतरी अडकू शकतात आणि व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचा एखाद्याशी वाद होऊ शकतो. तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी चांगले राहील.
मूलांक 5
मूलांक 5 असलेल्या लोकांनी नशिबाची साथ लाभेल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक फायदा होईल. कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने शांती मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात.
मूलांक 6
मूलांक 6 असलेल्या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी गमावल्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. आज आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळेल. ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. कोणतेही धोकादायक काम करणे टाळा. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
मूलांक 7
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायानिमित्त तुम्ही उच्च अधिकाऱ्याशी संपर्क साधून तुम्हाला भविष्यात चांगला फायदे होऊ शकतो. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता देखील निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तुमचा पगार देखील वाढू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला धनिष्ठा-शताभिषा नक्षत्रासह सुकर्मा रवि योग, अशी करा अनंताची पूजा
मूलांक 8
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मात्र या लोकांनी आर्थिक बाबतीत सावध राहावे. वाढत्या खर्चामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज कोणत्याही ठिकाणी पैशाशी गुंतवणूक करु नये अन्यथा अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबासाठी आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 9
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज नशिबाची साथ लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळू शकतात. यावेळी तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायात तुमची प्रगती होईल ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची योजना देखील आखू शकता. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक गोड होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)