फोटो सौजन्य- pinterest
20 जानेवारी रोजी शनि वर्षातील पहिले नक्षत्र बदल करणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण कर्माचे फळ देणारे नक्षत्र दीर्घ कालावधीनंतरच संक्रमण करतात. हे संक्रमण संथ गतीने होत असल्याने त्याचा शुभ अशुभ परिणाम देखील दीर्घकाळ टिकतात. सध्या तो मीन राशीमध्ये आहे आणि वर्षभर तो याच राशीमध्ये संक्रमण करणार आहे. मीन राशीत असताना शनि 20 जानेवारी रोजी दुपारी 12.13 वाजता उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. उत्तरभाद्रपद नक्षत्राचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत. जर शनि स्वतःच्या घरात म्हणजेच नक्षत्रात असल्यास त्याचा प्रभाव खूप वाढू शकतो. ज्याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. शनि नक्षत्र संक्रमणाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी नक्षत्र संक्रमणाचा काळ खूप खास असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. कुठेतरी अडकलेले पैसे तुम्ही सुरक्षितपणे परत मिळवू शकाल. सरकारी क्षेत्रातील फायद्यांसोबतच तुमचे संबंधही सुधारतील. न्यायालयीन प्रकरणांतून तुम्हाला दिलासा मिळेल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीतून इच्छित नफा मिळू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते.
कर्क राशीच्या लोकांसाठी नक्षत्र संक्रमणाचा काळ उत्साहाचा राहील. तुम्ही कला क्षेत्रात चांगले नाव कमवाल. यावेळी तुम्हाला कोणत्याही नवीन प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते. तुमची मानसिक शांती आणि आध्यात्मिक संतुलन देखील मजबूत करेल. लेखन क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता.
मकर राशीच्या लोकांसाठी नक्षत्र संक्रमणाचा काळ सकारात्मक राहील. शनीच्या प्रभावाखाली तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळेल. भौतिक सुखसोयी मिळतील आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. या काळात तुम्ही नवीन घराची खरेदी करु शकता. तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शनि गोचराचा प्रभाव 20 जानेवारी 2026 पासून विशेष स्वरूपात जाणवू लागेल. या काळात शनीची चाल काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.
Ans: धनलाभ, नोकरीत पदोन्नती, नवीन व्यवसाय संधी, अडकलेली कामे पूर्ण होणे आणि आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
Ans: नोकरीत स्थैर्य, वरिष्ठांची साथ, जबाबदाऱ्या वाढणे आणि वेतनवाढीची शक्यता आहे.






