फोटो सौजन्य- pinterest
आजचा 1 सप्टेंबरचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज 1 अंकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. आज सोमवार असल्याने आजचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 असतो. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना विचारपूर्वक निर्णय घ्यावे आणि कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. तर मूलांक 2 असणाऱ्या लोकांना मेहनत घ्यावी लागेल तर कामामध्ये अडथळा येऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्यपेक्षा चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. कोणतेही काम करताना तुम्हाला सावध राहावे लागेल आणि कोणत्याही व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. कुटुंबात सामान्य वातावरण राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. कोणत्याही कामात अडथळा येत असल्यास तुम्ही त्रस्त राहाल. कोणतेही निर्णय शांततेने घ्या.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज घरी पाहुणे येऊ शकतात. ज्यामुळे तुमचा आज खूप वेळ जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी गैरसमज विसरून पुढे जावे. जोडीदारासोबत वेळ घालवू शकता. त्यामुळे तुमच्यावरील तणाव कमी होईल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला स्वतःला कोणत्याही तणावापासून दूर रहावे लागेल. नाहीतर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यावेळी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी प्रकल्प पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी महत्वाची कामे पूर्ण होण्यात अडचणी येऊ शकतात. शारीरिक थकवा जाणवू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळा अन्यथा नुकसान होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस तणावपूर्ण राहील. कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीवरून तणाव निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मनात काही प्रकारच्या भावना येऊ शकतात. वडिलांसोबत मतभेद किंवा तणाव निर्माण होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कामाच्या ठिकाणी नवीन लोकांची ओळख होऊ शकतात.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी लाभ होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाने फायदा होईल. काही गोष्टीत तुमचे मन थोडे भटकू शकते. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)