 
        
        फोटो सौजन्य- pinterest
आजचा 31 ऑक्टोबरचा दिवस सामान्य राहील. आजच्या अंक 4चा स्वामी ग्रह राहू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर राहू ग्रहाचा प्रभाव राहील. आज शुक्रवार असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्र ग्रहाचा अंक 6 आहे. मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील आणि मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आज नशिबाची साथ मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. आज तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. रागावर नियंत्रण ठेवा. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला शांतता बाळगावी लागेल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही दीर्घकाळापासून रखडलेल्या समस्या लवकर दूर होतील. तुमचा तणाव दूर होईल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नवीन लोकांची ओळख होईल. तुमचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. व्यवसायामध्ये नवीन समस्या येऊ शकतात. तुम्हाला नवीन मार्ग सापडतील.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. म्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल. घरामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. ज्यामुळे तुम्ही व्यस्त राहाल आणि घरातील वातावरण आनंददायी राहील.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला कोणत्याही दीर्घकालीन समस्यांपासून आराम मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. ज्यामुळे ताण कमी होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ देखील घालवाल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता. तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे सर्व काम यशस्वी होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण अनुभवाल.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. सामाजिक सहभाग वाढण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी लक्षणीय फायदे मिळतील. तुम्हाला तुमचे व्यावसायिक संपर्क वाढवावे लागतील. यामुळे तुमच्या आयुष्यात नफा आणि आनंद येईल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल. तुम्हाला कुटुंबात काही शुभ बातम्या ऐकू येतील आणि कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






