फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार, 18 जानेवारी. आजचा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. आज पौष महिन्यातील अमावस्या आहे तिला मौनी अमावस्या असे म्हणतात. चंद्र धनु राशीतून मकर राशीत आज संक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचा शुक्र आणि बुध यांच्याशी युती झाल्यामुळे कलानिधि योग तयार होईल. मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे धनलक्ष्मी योगदेखील तयार होणार आहे. मकर राशीतील पाच ग्रहांच्या युतीमुळे पंचग्रही योग तयार होणार आहे. पूर्वाषाढा नक्षत्रानंतर, उत्तराषाढा नक्षत्रात व्यतिपात योग आणि हर्षण योग तयार होणार आहे. अमावस्येच्या दिवशी शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस फायदेशीर राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीमधून तुम्हाला चांगला फायदा होईल. तुम्हाला एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळेल. तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. सामाजिक क्षेत्रात तुमचा आदर वाढेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा राहील. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. सामाजिक कार्यात सहभागी असलेल्यांचा प्रभाव आणि आदर वाढेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असल्यास तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. आज तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकांना भेटण्याची संधी देखील मिळेल. आज तुम्ही खरेदी करू शकता. व्यवसायात तुम्हाला आर्थिक फायदा होईल. मालमत्तेशी संबंधित कामात गुंतलेल्यांना लोकांना अपेक्षित फायदा होऊ शकतो. जर तुम्ही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. कोणतेही अपूर्ण काम आज पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक जीवन चांगले राहील. राजकीय संबंधांमुळेही तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला परदेशातून फायदा होऊ शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. चालू असलेल्या कोणत्याही समस्या आणि अडचणी दूर होतील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. किराणा आणि कपड्यांचे व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. मालमत्ता आणि शिक्षण क्षेत्रातही तुम्हाला यश मिळेल. तुमच्या भागीदारीच्या कामात प्रगती होण्याची शक्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






