फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस चढ उताराचा राहील. आज पौष अमावस्या आहे. आज 9 अंक असलेल्यांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर आज मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेला दिसून येईल. रविवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी आणि मूलांक 9 असलेल्या लोकांनी अनावश्यक कामांपासून दूर रहा. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या बाबतीत अनावश्यक बाबतीत दूर रहा. वादविवाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. डोक दुखण्याची समस्या जाणवू शकते. दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कुटुंबासोबत खरेदीला जाऊ शकता. तुम्हाला भावंड आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी धावपळ होऊ शकते. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकता. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. तुम्हाला काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत संपर्क साधू शकता आणि भावंडांसोबत वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहील. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे. एकांतात वेळ घालवणे चांगले राहील. मित्रांसोबत वेळ घालवाल. त्यांच्यासोबत वेळ घालवाल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. एखाद्या गोष्टीवरून तुमची चिंता वाढेल. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. परदेशात व्यवसाय करण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मानसिक ताण वाढू शकतो. निर्णय घेताना सावध रहा. आरोग्याची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. रागावर नियंत्रण ठेवा आणि विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






